लोणावळा महाविद्यालयात नवे शैक्षणिक धोरण या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न



मावळ मराठा न्यूज,लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे डॉ. बी. एन. पुरंदरे कला श्रीमती एस. जी. गुप्ता वाणिज्य आणि श्रीमती शारदाबेन अमृतलाल मिठाईवाला विज्ञान महाविद्यालयामध्ये नवे शैक्षणिक धोरण व उच्च शिक्षणामध्ये त्याची अंमलबजावणी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील विद्या परिषद सदस्य प्रा. डॉ.संगीता जगताप यांनी मार्गदर्शन केले. नव्या शिक्षण धोरणाची भविष्यामध्ये असलेली गरज त्याचप्रमाणे नव्या शैक्षणिक धोरणाचे स्वरूप आणि त्याची अंमलबजावणी याबाबत डॉक्टर संगीता जगताप यांनी सखोल मार्गदर्शन केले. या कार्यशाळेकरिता लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष रमेशचंद्रजी नय्यर, सचिव दत्तात्रयजी पाळेकर, संस्थेच्या कायदेशीर सल्लागार ॲड. नीलिमाताई खिरे, महाविदयालय विकास समितीचे सदस्य पत्रकार विशाल पाडाळे, ऍड. अजय भोईर, श्री. सुनील ठोंबरे तसेच प्राचार्य डॉ. चंद्रशेखर भगत (व्ही.पी.एस. महाविद्यालय) आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. दिगंबर दरेकर यांनी केले. प्राध्यापिका रंजू बाला यांनी प्रमुख वक्त्यांची ओळख करून दिली. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ॲड. नीलिमा खिरे त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असणार आहे याकडे सर्वांचे लक्ष वेधले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भक्ती अहिर यांनी केले. उपस्थितांचे आभार डॉ. सुपर्णा मित्रा यांनी मानले. सदर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्ष आणि अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे समन्वयक डॉ. अमर काटकर यांनी केले होते.




