*लोणावळा नगरपरिषदेवर अतिक्रमण कारवाईच्या विरोधात १६ सप्टेंबरला भव्य मोर्चा*

मावळ मराठा न्यज – लोणावळा,लोणावळा नगरपरिषद तर्फे लोणावळा खंडाळा परीसरातील टपरी पथारी हातगाडी धारकांना अतिक्रमण काढण्यात येणार आहे अशी नोटीस बजावली आहे.एकिकडे केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार ने २००९ रा.फे.धो ,२०१४,२०२४ व इतर जी. आर.काढुन त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व नगरपरिषदेंना सांगितले आहे परंतु आपली लोणावळा नगरपरिषद या कामी निष्क्रिय ठरत आहे.तरी या कारवाईच्या विरोधात लोणावळा नगरपरिषदेवर भव्य मोर्चा बुधवार दिनांक १६ .९ .२०२६ रोजी सकाळी १० वा जाणार आहे तरी सर्वांनी आपले व्यवसाय बंद ठेवून लोणावळा नगरपरिषदेवरील मोर्चात सहभागी व्हावे ही विनंती मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष डॉ श्री बाबा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली मावळी शेतकरी पुतळा येथुन दि १६ .९ .२०२६ रोजी सकाळी १० वा निघेल तरी सर्वांनी वेळेवर आवर्जून उपस्थित राहावे.अध्यक्ष श्री गणेश गोपाळराव चव्हाण. कार्याध्यक्ष श्री सुनील भाऊ कुचेकर.सचिव श्री रमेश द म्हाळस्कर तसेच सर्व पथविक्रेता समिती सदस्य व पदाधिकारी व कार्यकर्ते लोणावळा खंडाळा.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page