मानवी हक्क संरक्षण आणि जागृती व मनपा आरोग्य विभागाच्या यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश मंडळाच्या समोर आरतीच्या वेळी डेंग्यू, चिकन गुन्या आजाराबाबत जनजागृती

मावळ मराठा न्युज – पिंपरी,गणेश मंडळाच्या समोर आरतीच्या वेळी डेंग्यू ,चिकनगुन्या आजाराबाबत जनजागृती. मानवी हक्क संरक्षण आणि जागृती व मनपा आरोग्य विभागाच्या यांच्या संयुक्त विद्यमाने नवी सांगवी, पिंपळे गुरव परीसरात डेंग्यू,चिकनगुन्या आजाराबाबत संध्याकाळी सात ते नऊ वेळात दररोज पाच  मंडळामध्ये स्पीकरद्वारे, माहितीपत्रक वाटून डेंग्यू चिकनगुन्या आजाराची जनजागृती करण्यात आली. डेंग्यू आजार होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी आणि झाल्यावर त्यावरील उपाय योजनांची माहिती स्वतः शहराध्यक्ष आण्णा जोगदंड हे स्पीकरमधून गणेश भक्तांना देत आहेत,ही जनजागृती अनंत चतुर्थी पर्यंत चालणार असल्याचे जोगदंड यांनी सांगितले.आरोग्य निरीक्षक स्नेहल सोनवणे  म्हणाल्या कि डेंग्यू आजार म्हणजे डंक छोटा, धोका मोठा, त्यामुळे हिवताप, डोकेदुखी, अंगावर लालसर रंग येणे,तीव्र पाठ दुखी,पुरळ उठणे असे लक्षणे दिसून आल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे त्यांनी आव्हान केले. प्लास्टिक न वापरण्याची व पर्यावरण रक्षणाची गणेश भक्तांना जोगदंड यांनी यावेळी शपथ दिली.आज महाराष्ट्र मित्र मंडळ ,समतानगर मित्र मंडळ,सत्ता प्रतिष्टान, शिव प्रतिष्ठान, शिवराय मित्र मंडळ याठिकाणी जनजागृती घेण्यात आली.यावेळी जनजागृती मोहीमेत शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, आरोग्य निरीक्षक स्नेहल सोनवणे,  नगरसेविका दीप्ती कांबळे,बेसिक टीमचे पवन रंधे, महाराष्ट्र मित्र मंडळाचे अध्यक्ष मनीष भापकर,मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी,समतानगर मित्र मंडळ उत्सव समिती धीरज बारणे उपाध्यक्ष अनिरुद्ध बारणे सचिव अक्षय कुंभार . केदार घोरपडे, मनोज मदने,तेजस पाटील, अखिल देसाई सत्ता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रतीक जाधव संस्थापक सौरभ शिंदे, सत्ता प्रतिष्ठानचे अध्यक्ष सौरभ शिंदे, शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत माटुर,उपाध्यक्ष अविनाश इंदलकर, कार्याध्यक्ष विशाल नाथबोने, सचिव निलेश गाडेकर, प्रसाद पवार,शिवराया मित्र मंडळाचे अध्यक्ष रोहित भिसे, रोहित राऊत  सा. का.शिवानंद तालीकोटी, वसंत मांडे, ह भ प अशोक ढोरे, सा.का.दीपक गायकवाड  महाराष्ट्र मित्र मंडळाचे उपाध्यक्ष दीपक गायकवाड खजिनदार राजेश साळुंखे तसेच विजय इंगळे,मेल्विन मेंड्रोस,मनोज जगताप,संदीप बर्गे,निखिल जगताप,संदीप बर्गे,कुलदीप गुजर,सचिन बर्गे,ध्रुविल भिलारे मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.फोटो वळ:- नवी सांगवी, पिंपळे गुरव मध्ये मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने जनजागृती करताना कार्यकर्ते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page