सेंटर फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया व एकलव्य फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने देवघर येथे मोफत नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वाटप शिबिर संपन्न


मावळ मराठा न्यूज:-लोणावळा,सेंटर फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया (CFTI) व एकलव्य फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वाटप शिबीर भैरवनाथ मंदिर देवघर येथे आज दि.८ मे रोजी सकाळी ९:०० ते सायंकाळी ४:०० यावेळात संपन्न झाले.५९७ लोकांनी चेक अप केले,४७७ जणांना चष्म्याचे वाटप करण्यात आले तर ५७ मोतीबिंदू आणि ६३ जणाचे नॉर्मल डोळे तपासण्यात आले.सामाजिक कार्यकर्ते राजेश खंडेलवालजी या शिबिरात मोतीबिंदू तपासणी,चष्मा नंबर तपासणी या तपासण्या मोफत करण्यात आल्या तर ज्यांना चष्मा नंबर आहे त्यांना मोफत चष्मा वाटप करण्यात आला आहे.या मोफत नेत्र तपासणी शिबिरात जेवरेवाडी,करंडोली, नवखंडेवाडी,देवघर, वाकसई, इंद्रायणी नगर,संत तुकाराम नगर,वाकसई चाळ येथील तरुण तरुणी जेष्ठ नागरिक व महिलांनी मोठया संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतला तसेच CFTI संस्था व एकलव्य फौंडेशन यांनी राबविलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबीर आणि मोफत चष्मा वाटप या कार्याचे भरभरून कौतुक नागरिकांकडून करण्यात आले,तर हा उपक्रम जेष्ठ नागरिकांसाठी मौल्यवान असल्याच्या प्रतिक्रिया देखील अनेकांनी दिल्या.




