प्रसिद्ध ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचं तळेगाव दाभाडेजवळ आंबी या गावातील घरी निधन


मावळ मराठा न्यूज़ :- तळेगाव , दि. १५ जुलै २०२३ :- तळेगाव एमआयडीसीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सावंत यांनी सांगितलं की, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार महाजनी यांचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा. गेल्या आठ महिन्यांपासून ते एकटेच या घरात राहत होते.शुक्रवारी तळेगाव दाभाडेजवळ आंबी या गावातील घरी प्रसिद्ध ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे ते मृतावस्थेत सापडले. ते गेल्या काही महिन्यांपासून इथं भाड्याने राहत होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यांचं निधन दोन ते तीन दिवसांआधी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. रवींद्र महाजनी यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.पिंपरी चिंचवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “फ्लॅटमधून दुर्गंधी आल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. आमच्या टीमने दरवाजा तोडला आणि फ्लॅटमध्ये महाजनी मृतावस्थेत आढळले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तळेगाव दाभाडे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे,” असंही ते म्हणाले. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.रवींद्र महाजनी यांचा मुलगा व मराठी अभिनेता गश्मीर महाजनीला पोलिसांनी कळवलं आहे. गश्मीर मुंबईला राहतो, माहिती मिळताच तो तळेगाव तिथे येण्यासाठी रवाना झाला आहे. शविच्छेदनानंतर महाजनी यांचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला जाईल, तसेच मृत्यूचं कारणही कळेल, अशी माहिती पोलिसांनी दिली.गश्मिर महाजनी हा त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. तो देखील चित्रपट क्षेत्रात आघाडीचा अभिनेता आहे.१९७५ ते १९९० चा काळ त्यांनी गाजवला. देखणेपण, रुबाबदार, दमदार अभिनय या जोरावर त्यांनी अनेक चित्रपट गाजवले. त्या काळी ते अनेकांच्या गळ्यातील ताईत बनले होते. रवींद्र महाजनी यांचा ” मुंबईचा फौजदार” , देवता हे चित्रपट खूप गाजले. रवींद्र माहाजनी आणि रंजना देशमुख यांची जोडी त्यावेळी विशेष गाजली. मात्र त्यांच्या मृतदेह अशा अवस्थेत आढळल्याने सर्वानाच धक्का बसला आहे.रवींद्र हणमंत महाजनी यांचा जीवनप्रवास१९७४ साली आलेला हा चित्रपट खूप गाजला आणि त्यानंतर रवींद्र महाजनी नावाचा नवा तारा मराठी चित्रपट सृष्टीला मिळाला होता.रवींद्र महाजनी यांचे चित्रपट,आराम हराम आहे,लक्ष्मी,लक्ष्मीची पावलं,देवता, गोंधळात गोंधळ,मुंबईचा फौजदार,बेलभंडार,अपराध मीच केला,काय राव तुम्ही,कॅरी ऑन मराठा ,देऊळ बंदपानिपत या चित्रपट आपली छाप टाकली आहे.




