डॉ. डी. वाय. पाटील पिंपरी,शैक्षणिक संकुलामध्ये रक्तदान

मावळ मराठा न्यूज़ ,पिंपरी(प्रतिनिधी) आकुर्डी स्थित डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. डी. वाय. पाटील साहेब यांच्या ८८ व्या वाढदिवसानिमित्त डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलातर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. डॉ. डी. वाय. पाटील (दादा) यांचा रविवार दि. २२/१०/२०२३ रोजी ८८ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुल आकुर्डी यांनी हा सप्ताह ‘वाढदिवस सप्ताह ‘ म्हणून साजरा करण्याचे योजिले असून विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याचा एक भाग म्हणून हे रक्तदान शिबिर १८/१०/२०२३ रोजी आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन वाय. बी. पाटील पॉलिटेक्निक तर्फे, डॉ. डी. वाय. पाटील वै्दयकिय महाविद्यालय यांचे सहकार्याने करण्यात आले. यासाठी संकुलाचे संचालक रीअर ॲडमिरल अमित विक्रम, मुख्य वित्तिय अधिकारी श्री. बी. एच. शर्मा, प्राचार्य डॉ. ए. एस. कोंडेकर ,संकुलातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, वाय. बी. पाटील पॉलिटेक्निक आणि इतर महाविद्यालयांचे विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक, इतर कर्मचारी व विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते. रक्तदात्यांचा या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमासाठी डॉ. डी. वाय. पाटील, आकुर्डी शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष मा. डॉ संजय डी. पाटील , उपाध्यक्ष व चेअरमन मा. श्री. सतेज डी. पाटील सर व विश्वस्त तेजस पाटील सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.





