वारसा स्वच्छतेचा,मावळा शिवरायांचा”अंतर्गत स्वच्छता मोहीम, १० मे रोजी चलो टायगर,लायन्स,शिवलिंग पॉइंट – सत्य साई कार्तिक यांचे आवाहन


मावळ मराठा न्यूज ,लोणावळा,पुणे ग्रामीण,जिल्हा पोलिस,लोणावळा उपविभाग आयोजित “वारसा स्वच्छतेचा,मावळा शिवरायांचा” अंतर्गत स्वच्छता मोहीम पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक अंकित गोयल,पुणे ग्रामीण चे अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्राची कुलदेवी असलेल्या वेहेरगाव येथील आई एकवीरा देवी मंदिर आणि बौद्धकालीन लेणी परिसर स्वच्छ करण्यात आला त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या लोहगड किल्ला आणि परिसर येथे स्वच्छ्ता मोहीमेला पोलीस अधिकारी ,कर्मचारी, नागरिक, वकील, सामाजिक संस्था,शिवदुर्ग मित्र,लोणावळा शहर पत्रकार संघ यांनी आणि गड कोट किल्ले प्रेमी यांनी भरभरून प्रतिसाद देत तेथील कित्येक टन कचरा संकलित करून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. उद्या दिनाक १० मे बुधवार रोजी सकाळी ६ .३० वाजता पर्यटकांचे आकर्षण असलेले टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट, येथील धार्मिक स्थळ शिवलिंग पॉइंट येथे स्वच्छता मोहीम राबविन्यात येणार असल्याचे लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी आय पी एस सत्य साई कार्तिक यांनी मावळ मराठा न्यूज शी बोलताना सांगितले,तरी सर्व नागरिकांनी आपला मावळ परिसरातील गड किल्ले सोबत मंदिरे व महत्वाची पर्यटन स्थळे स्वच्छ व सुंदर ठेवन्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी या स्वच्छता मोहिमेत सहभागी होवू या,आणि परिसर स्वच्छ ,सुंदर बनवून त्यांचे पावित्र्य राखू या असे आवाहन कार्तिक यांनी केले आहे.उद्याचा मोहिमेत देखील शिवदुर्ग मित्र,लोणावळा शहर पत्रकार संघ ,सिंहगड महाविद्यालय ,उदय शेट्टी मित्र परिवार वकील, समस्त ग्रामस्थ सहभागी होणार आहेत .




