लोणावळ्यातील भांगरवाडी उड्डानपुल, लोणावळा नगरपरिषद ४ आणे वाचवण्यासाठी १२ आणे खर्च करतेय; बचतीच्या नादात मोठे नुकसान’ -ऍड माधवराव भोंडे





मावळ मराठा न्युज – लोणावळा नगरपरिषद काही पैसे वाचवण्याच्या प्रयत्नात त्याहून अधिक खर्च होत आहे का?अक्कलकोटकर यांना द्यावी लागणारी भरपाई फारशी महत्त्वाची नाही; कायद्यातील तरतुदींनुसार लोणावळा आवश्यक तो मोबदला नगरपरिषदेला तो द्यावाच लागेल.बांधकाम खर्च किती प्रमाणात वाढत आहे, हे लोणावळा नगरपरिषदने तपासणे आवश्यक आहे.माझ्याकडे नेमकी आकडेवारी नाही, परंतु समजा अक्कलकोटकर यांना २५ लाख रुपये अधिक द्यावे लागणार असतील, तर या विलंबामुळे महागाई किंवा वाढत्या बांधकाम खर्चामुळे दरमहा २५ लाख रुपयांचे नुकसान होत आहे असे परखड मत लोणावळ्यातील ऍड माधवराव भोंडे यांनी मावळ मराठा न्युज शी बोलताना व्यक्त केले.गेल्या ६ वर्षांत प्रकल्पाचा खर्च कितीतरी पटीने वाढला आहे याचा विचार लोणावळा नगरपरिषद ने करणे गरजेचे आहे.एका बाजूला या प्रकल्पला होणारा विलंब आणि दुसऱ्या बाजूला मंजूर निधी परत गेला.आता पुन्हा त्यासाठी पत्रव्यवहार, पाठपुरावा करावा लागणार थोडक्यात पुन्हा विलंब.लोणावळेकरांची थट्टा चालू आहे असेच म्हणावे लागेल.संपूर्ण प्रकल्पाची किंमत किती प्रचंड प्रमाणात वाढली असेल,याचा हिशोब मांडणे गरजेचे आहे.हे सर्व एका बाजूला, पण यामुळे लोणावळ्यातील नागरिकांची आणि एकूणच समाजाची जी मोठी गैरसोय होत आहे, याचा विचार लोणावळा नगरपरिषद कधी करणार आहे हा प्रश्न आहे.



