तळेगाव येथे रोटरी क्लब,लायन्स,स्वामी विवेकानंद योगा ग्रुप आणि कलापिनी हास्य क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योगा दिन साजरा

मावळ मराठा न्यूज़, तळेगाव – रोटरी क्लब ऑफ मावळ,आय एम ए महाराष्ट्र स्टेट- लायन्स, स्वामी विवेकानंद योगा ग्रुप आणि कलापिनी हास्य क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून जागतिक योगा दिन अत्यंत उत्साहात येथील सुशीला मंगल कार्यालयात संपन्न झाला. आय एम ए महाराष्ट्र राज्याचे स्पिरीच्युअल हेल्थ चेअरमन डॉ. शालिग्राम भंडारी- रोटरी क्लब मावळ चे अध्यक्ष ॲड . दीपक चव्हाण, ज्येष्ठ रो दादासाहेब उरहे ,रो विलास काळोखे,रो शशिकांत हळदे, रो हरिश्चंद्र गडसिंग,रो सुरेश शेंडे डॉ.अनंत परांजपे आणि प्रकल्प प्रमुख रो.मनोज ढमाले या सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले .रो. अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रस्ताविक करून प्रत्यक्ष योगासनाला सुरुवात करण्यात आली. योगशिक्षक श्री व सौ विठ्ठल गोंधळेकर श्री प्रदीप साठे श्रीमती स्नेहल रानडे आणि हास्ययोग घेणारे डॉक्टर अनंत परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपस्थित योग साधकांनी अत्यंत उत्साहाने आपला सहभाग नोंदविला! त्यानंतर सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ. डॉ.ईश्वर झंवर यांनी हृदयरोग कारणे, लक्षणे व उपाय या विषयावर व्याख्यान दिले. व्याख्यानानंतर उपस्थित श्रोत्यांनी या संदर्भात अनेक प्रश्न विचारून शंकानिरसन केले.योगगुरु विठ्ठलपंत गोंधळेकर,स्नेहल रानडे,प्रदीप साठे ,पुनम ढोरे,हास्ययोग गुरु डॉ.अनंत परांजपे,तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने या मान्यवरांना यावेळी सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.तसेच साईबाबा कुस्ती संकुलाचे संस्थापक अध्यक्ष पै.नागेश गजानन राक्षे यांना त्यांच्या विशेष कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख आयोजक मावळ डिलाईट दूध ढमाले डेरीच्या वतीने बेबडओहोळ येथील श्री.ज्योतिबा विद्यालयाच्या दहावीच्या परीक्षेत उल्लेखनिय यश प्राप्त करणाऱ्या आर्यन विद्यासानी,मनाली सुरेश घारे,संतोष मुरकुटे,सायली पनाजी हिंगे,ज्ञानेश्वरी बाळू हिंगे,यांना सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो.रेश्मा फडतरे यांनी केले तर आभार डॉ.शाळीग्राम भंडारी यांनी मानले.रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे माजी अध्यक्ष व ढ माले डेरीचे मालक रो.मनोज ढमाले यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित सभासदांनी तसेच मित्रपरिवार व सगे सोयरे यांनी शुभेच्छा दिल्या. त्या सर्व समारंभाच्या यशस्वीतेसाठी रो.एड.दीपक चव्हाण,रो.सुरेश शेंडे,डॉ.अनंत परांजपे,लायन डॉ.शाळीग्राम भंडारी, रो.मनोज ढमाले यांनी विशेष परिश्रम घेतले!उपस्थित सर्व सभासदांना मावळ डिलाईट दूध यांच्या वतीने दुधाच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी,राजेश गाडेपाटील,भगवान शिंदे,अशोक काळोखे,संजय मेहता,संतोष शेळके,प्रशांत भागवत,निर्मल ओसवाल,सुनील पवार,रवी घारे,तानाजी मराठे, अविनाश नागरे,विशाल चव्हाण,रुपेश चव्हाण जयसिंग वाळुंज, लायन दीपक बाळसराफ,भरत पोतदार यांच्यासह चारही संस्थांचे सदस्य व तळेगाव नगरीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते! सुग्रास ब्रेकफास्ट आणि चविष्ट दुग्धपानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page