मध्य रेल्वेच्या वतीने जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन;कोविड नंतर थांबा कमी केलेल्या गाड्यांचे थांबे पूर्ववत करावेत,पुणे लोणावळा लोकल खंडाळापर्यंत आणावी

मावळ मराठा न्युज – लोणावळा,मध्य रेल्वेच्या वतीने जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असताना दरम्यान दरम्यान खंडाळा रेल्वे स्थानकात पर्यटक रोज प्रवास करणारे चाकरमानी व प्रवासी यांच्या समस्या बाबत चर्चा होत असताना कोविड नंतर थांबा कमी केलेल्या गाड्यांचे थांबे पूर्ववत करावेत. पुणे लोणावळा लोकल खंडाळा पर्यंत आणावी,ज्या गाड्यांना रेल्वे कर्मचाऱ्यांकरिता तांत्रिक थांबा आहे त्या गाड्यांचे थांबे कायम करावेत वाणिज्य कारणास्तव खंडाळा रेल्वे स्टेशन वरील बुकिंग ऑफिस(तिकीट खिडकी) बंद करण्यात आली होती ती पुन्हा सुरू करावी व त्याचबरोबर स्वयंचलित तिकीट मशीन बसवावी. मुंबई पुणे रेल्वे आणि महामार्ग वर असलेले खंडाळा थंड हवेचे ठिकाण हे रेल्वे अधिकाऱ्यांनी लक्षात घेऊन त्या दृष्टीने रेल्वे गाड्यांचे थांबे, प्रवाशांना सुविधा, व येणाऱ्या अडचणी यावर सर्वे करून या सर्व प्रश्नातून त्वरित मार्ग काढून नागरिकांच्या सूचनांना न्याय द्यावा. व रेल्वे प्रवास चांगला आनंदी आणि सुखमय होण्यासाठी अधिकाऱ्यांनी या गोष्टींचा विचार करावा.. अशा प्रकारचा संवाद खंडाळ्यातील नागरिक व अधिकारी यांच्या मध्ये झाला. जनसंवाद कार्यक्रमास मध्य रेल्वे कडून संकेत मिश्रा(सीएमपीइ) अजय कुमार (डीसीएम गुड्स) डी के सिंग(एस एम खंडाळा) प्रवीण भोसले(डी .वाय. एस लोणावळा) तसेच कर्मचारी अशोक डाक आरपीएफ चे अधिकारी.. खंडाळा ग्रामस्थांच्या वतीने मच्छिंद्र खराडे मा. जिल्हाप्रमुख शिवसेना, श्री भालचंद्र खराडे मा. नगरसेवक, दिलीप ओसवाल,अशोक मानकर, सिताराम कचरे पाटील, गोपीचंद सोनवणे, संजय कदम, नरेंद्र कचरे पाटील, सुरेश गायकवाड अनिकेत गायकवाड, सुमित गायकवाड, सुरेश काळे, वसंत ओसवाल, दिनेश जैन, राजन कदम, संजय कदम, दीपक घोरिंदे, विजय मातेरे, भीम कचरे पाटील, आबा पाटील, संपत काजळे, सनी सोलंकी, गणेश वाडकर, बिपिन मंडलिक, मिलिंद धुळे, धनंजय कदम, संदीप पवार, धैर्यशील तिथे, तेजस थिटे, शशिकांत गायके, गोरक्ष लोणकर, चंद्रकांत राऊत, गणेश पाठक, राजेश महाडिक, योगेश सामंत,अनिकेत ओसवाल, श्याम खराडे, विजय मातेरे, गणेश फाटक, सिद्धू, आदी मान्यवर उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page