आरोग्य मंत्री डाॅ तानाजी सावंत यांनी दिलेत मळवलीत सामुदायिक विवाह सोहळयातील नवदाम्पत्याला शुभेच्छा!

मावळ मराठा न्यूज -: कार्ला मळवली परीसरातील कार्येकर्तेच्या संकल्पनेतून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून तालुक्यासह बाहेरील अशा सहा जोडप्यांचा विवाह सोहळा थाटामाटात साजरा झाला.या विवाह सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री डाॅ तान्हाजी सावंत यांनी उपस्थिती लावुन नववधुवरांना शुभेच्छा दिल्या. वधुस,साखरपुड्याची साडी,लग्नाचा शालु ,मणी मंगळ सुत्र,कर्णफुले,असं एक तोळा सोनं, पैजण, जोडवी, नथ, मनगटी घड्याळ,तर वरास साखरपुडा व लग्नाचा पोशाखा सह मनगटी घड्याळ देण्यात आले.नव दांपत्यास वृक्षलागवडीचा संदेशम्हणुन एक वडाचे झाड देण्यात आले. सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करुन या सामुदायिक विवाह सोहळ्यास आनंदीमय वातावरणात सुरुवात झाली.ठरलेल्या वेळेनुसार,साखरपुडा,हळद,वह्राडी मंडळीचे भोजन झाल्यावर नवरदेवांची पारंपारिक बैलगाडीत, ढोलताशाच्या गजरात व तुतारीच्या स्वरात भव्य मिरवणूक विवाह सोहळा कमिटीच्या वतीने काढण्यात आली.ठरल्याप्रमाणे वरराजा मंडपाच्या व्दाराजवळ आल्यानंतर मावळन आत्यांनी औक्षण केल्यावर वधुवरांना वाजतगाजत विवाह मंचावर आणण्यात आले.मंत्री तानाजी सावंत,बापू भेगडे,चंद्रकांत सातकर,बाळासाहेब नेवाळे यांनी वधुवरांना शुभेच्छा दिल्या तर ह भ प दिलीप महाराज खेंगरे यांनी नवदांपत्यास शुभाशीर्वाद दिले.तद्नंतर मंत्रोच्चार करत मंगलाष्टकाने मोठ्या दिमाखात हा विवाह सोहळा संपन्न झाला. साडं झाल्यावर नव वधुवरांच्या वरबापांची सर्व सभासदांनी गळाभेट घेतली.शेवटी नव वधुंची भावमय वातावरणात वधु कडील मंडळी व सोहळा कमिटीने पाठवणी केली.अंत्यत देखण्या स्वरूपात झालेल्या या सोहळ्यास महाराष्ट्र क्राॅग्रेस कमिटीचे सुनिल चव्हाण,मावळचे आमदार सुनिल शेळके,माजी सभापती विठ्ठल शिंदे ,शिवसेना तालुकाप्रमुख राजेश खांडभोर,आर पी आय उपाध्यक्षा यमुना साळवी,माजी नगरसेविका बिंद्रा गणात्रा, यांच्यासह,राजकिय,धार्मिक,सामाजिक,श्रेत्रातील अनेकांनी उपस्थिती लावली .धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सामुदायिक विवाह सोहळ्याचे संस्थापक अध्यक्ष शरद हुलावळे,सोहळा कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत शेलार,रजिस्टर कमिटीचे अध्यक्ष दत्तात्रय केदारी,यांच्यासह सर्व पदाधिकारी व सोहळा कमिटीच्या सर्व सदस्यांनी हा विवाह सोहळा पार पडण्यासाठी परीश्रम घेतले.कमिटीतील तसेच कमिटी बाहेरील अनेकांनी या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी मदत केली. शाही थाटात झालेल्या या सोहळ्याचे प्रास्ताविक शरदराव हुलावळे,यांनी तर पाहुण्याचे स्वागत कमिटीच्या उपाध्यक्षा सायलीताई बोत्रे यांनी केले.व सुत्रसंचालन भाऊसाहेब हुलावळे,शांताराम ढाकोळ,मच्छिंद्र केदारी,सचिन भानुसघरे,संदिप तिकोणे,भगवान देशमुख,विनायक कोंडभर यांनी केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page