लोणावळा नगरपरिषद प्रवेश द्वारावरील वाचमन कॅबिन उदघाटनाचा प्रतीक्षेत! कोण मंत्री येणार याची लोणावळेकरांना उत्सुकता

मावळ मराठा न्युज – लोणावळा,लोणावळा नगरपालिकेच्या गेटवर वॉचमन कॅबिन बनवण्यात आली आहे तिला जवळपास एक वर्ष झाले परंतु उद्घाटन साठी काय लोणावळा नगरपरिषद कोणत्या VIP, आणि मंत्र्यांची वाट पाहत आहे कां? हे अद्याप कळत नाही. एवढ्या छोट्याश्या वाचमन केबिन च्या लोकार्पण सोहळाचे आमंत्रण कधी मिळणार याची प्रतीक्षा लोणावळेकर नागरिक करत आहेत. नगरपालिकचे प्रशासन व नगरपालिका नगराध्यक्ष आणि लोकप्रतिनिधी यांना या उदघाट्नची अदयाप तारीख ठरवता आली नाही. नागरिकांच्या पैशाची अशी उधळपट्टी केली जात आहे. वॉचमन हे सतत गप्पा मारत बसतात व गेट वर कॅबिन मध्ये मुख्य गेटवर वॉचमन याना तेथे ड्युटी व्यवस्थित बजावता येईल आणि शनिवार, रविवार सुट्टी च्या दिवशी लोणावळा नगरपरिषदेत बाहेरून येणाऱ्या नागरिकांची कोणतीही चौकशी केली जात नाही. त्यामुळे आओ जावो घर तुम्हारा झालं आहे. याने एखादी विपरीत घटना घडू शकते.त्यामुळे बाहेरून येणाऱ्या नागरिकांची नोंद व्हावी अशी अपेक्षा.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page