लोणावळा नगरपालिका गवळीवाडा शाळा क्रमांक ६ येथे तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

मावळ मराठा न्युज -लोणावळा, लोणावळा नगरपालिका गवळीवाडा शाळा क्रमांक ६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय येथे दिनांक६ मार्च २०२६ रोजी तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळेमध्ये अनेक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा तसेच राम मंदिर पासून शिवज्योत आणण्यात आली. त्याचबरोबर लोकनाट्य,पोवाडा,श्री छत्रपती शिवाजी महाराजांची आरती अशी विविध कार्यक्रम घेण्यात आली. याप्रसंगी लोणावळा नगरपालिका च्या नवनिर्वाचित नगरसेविका व शिक्षण विभागाच्या सभापती सन्माननीय सौ दीपिका अगरवाल तसेच लोणावळ्याचा या वार्डामधील नगरसेविका सौ वैशाली मोगरे तसेच नगरसेवक श्री अनिल गवळी हेही उपस्थित होते. त्याचबरोबर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पालक वर्ग व मान्यवर मंडळी,अंगणवाडीच्या शिक्षिका सर्वजण उपस्थित होते. सर्वांनी पालकांचे व शिक्षकांचे या कार्यक्रमाच्या निमित्ताने कौतुक केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page