मनसे कडून प्रतीकात्मक लोणावळा नगरपरिषदेचे भ्रष्टाचाराचे चंद्रयान रस्त्यावर

मावळ मराठा न्यूज़ लोणावला:- लोणावळा शहरामध्ये मागच्या महिन्यात बनवलेल्या रस्त्यांवर खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून यामध्ये अधिकारी व ठेकेदार यांच्या संगणमताने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून निकृष्ठ दर्जाचे रस्ते बनविले आहेत.यामुळे अपघात होऊन अनेक नागरिक जखमी झाले आहेत. हे रस्ते बनविणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकून त्याला लोणावळा नगरपालिकेचे कोणतेही काम इथून पुढे देऊ नये अशी मागणी करण्यात आली तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी या रस्त्याच्या कॉलिटी कडे दुर्लक्ष केल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवरती सुद्धा निलंबनाची कारवाई करण्यात यावी व खराब झालेले रस्ते तात्काळ दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी मनसे कडून करण्यात आली.अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांचा निषेध नोंदविण्यासाठी मनसे कडून प्रतीकात्मक लोणावळा नगरपरिषदेचे भ्रष्टाचाराचे चंद्रयान रस्त्यावरती उतरवण्यात आले होते तसेच मनसेचे लोणावळा शहराध्यक्ष भारत चिकणे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष अशोक कुटे, अमित भोसले, दिनेश कालेकर मधुर पाटणकर यांनी अंतराळवीरांची वेशभूषा साकारत आंदोलनात सहभागी झाले होते.यावेळी मनसेचे निखिल भोसले, सुनील भोंडवे, उमेश बोडके, निखिल सोमण, अभिजीत फांगसे, रोहिदास शिंदे, सुनील होजगे,सुरेश राठोड,सुनिल सावळे, अविनाश पाटील,रवी मानकर, परेश वावळे,अजिंक्य बोभाटे, प्रशांत वैद्य, डॉ विनायक शेणवेकर, गौतम रावळ, अनिल अल्हाट, राजू मुळे, योगेश कदम, निर्मल आंबेकार, अनिश शेटे, संतोष येवले आदि महाराष्ट्र सैनिक व लोणावळेकर नागरिक ह्या आंदोलनात सहभागी झाले होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page