*अभंगकार ह भ प श्री पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीसपदी निवड*

मावळ मराठा न्युज नेटवर्क -महाराष्ट्राच्या मराठी साहित्य सेवेमध्ये गेली अनेक वर्षे हिंगणकर महाराज साहित्य सेवेत कार्यरत आहेत त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरदजी गोरे आणि राष्ट्रीय उपाध्यक्षा शुभांगीताई काळभोर यांच्या सहीचे नियुक्ती पत्र ह भ प श्री पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांना दि ८/८/२०२५ रोजी प्राप्त झाले आहे महाराजांची साहित्य सेवा १९९० पासून श्रीगुरु वासुदेव महाराज यांच्या श्रद्धा सागर अकोट यांच्या जीवन चरित्र आधारित ओवीबद्ध ग्रंथ प्रकांशित करून सुरु झाली आहे तसेच त्यांचा महाराष्ट्राच्या साहित्य सेवेत खूप मोठे योगदान आहेत ते कीर्तनकार,प्रवचणकांर, साहित्यिक,अभंगकार म्हणून अख्या महाराष्ट्राला ते परिचित आहेत त्यांचे वासुदेव पासष्टी,अभंग निर्झर भाग १, अभंग निर्झर भाग २ असे तीन ग्रन्थ प्रकाशित असून समज मनं जपणाऱ्या आध्यत्मिक व दैवीक संत काव्यानुभूतीचा अनुभव त्यांच्या काव्यातून येतो समाजोन्नतीसाठी त्यांनी संत नामदेव महाराज संत ज्ञानेश्वर महाराज , संत तुकाराम महाराज आदी करून वारकरी संत मंडळीच्या पावलावर पाऊल ठेऊन मराठी भाषेसाठी उच्च कोटीचे योगदान त्यांच्या यां अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून सरचिटणीस पदी नियुक्ती झाल्या मुळे महाराष्ट्राच्या संस्कृती मध्ये नक्कीच भर पडेल असे असे महाराष्ट्रातील जनतेचीं अपेक्षा पूर्ण करण्याचा त्यांचा माणस आहे हिंगणकर महाराजांचे साहित्य लिखाण मराठी सहित संस्कृत व हिंदी प्रभाव सर्व सोशल मीडियावर जनता अनुभवत असते बरेच अभंग संस्कृत श्लोक वाचायला मिळतात तसेच साहित्य सेवे बरोबरच समाज सेवे मध्ये ही त्यांचे फार मोठे योगदान आहे मग ते इंद्रायणी स्वच्छता अभियान असो किंवा सिद्धिबेट संत ज्ञानेश्वर यांची सिद्धभूमी असो त्यासाठी त्यांची अनेक आंदोलने, उपोषणे आणि साहित्यातून जन जागृती केली आहे करीत आहेत त्यांचे अनेक व्यासपीठावरून काव्य संमेलनी अध्यक्षपद भूषविले तर अनेक काव्य संमेलनात प्रमुख अतिथी, प्रमुख पाहूणे म्हणून कवी संमलेलने पार पडली तर अनेक कवितेच्या मंचावरून कविता अभंग सादर केलेत. त्यांच्या मुळे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या सरचिनीस पदी निवड झाल्याने महाराष्ट्राच्या संस्कृतीत नक्कीच भर पडेल. त्यांचे अखिल भारतीय वैष्णव कला साहित्य मंच यां व्हाट्सअप ग्रुप यां माध्यमातून अनेक,कवी अभंगाकार देश विदेशात घडवले ही सेवा गेली सहा वर्षे ते पर्सनल विनामूल्य साहित्य सेवा करीत आहेत.त्यामुळे त्यांचा चाहता वर्ग असून देशविदेशात सुद्धा मराठीचा झेंडा रोवला आहे. संत साहित्यरत्न पर्यावरण, समजभूषण सारखे अनेक पुरस्कारही त्यांना प्राप्त आहेत.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page