*वडगांव येथे महसूल सप्ताह शुभारंभ,उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्याना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान*

मावळ मराठा न्युज-वडगांव,दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी मावळ तालुक्यात महसूल दिन व महसूल सप्ताह शुभारंभ कार्यक्रम भेगडे लॉन्स येथे वडगाव मावळ येथे घेण्यात आला. कार्यक्रमास सुरेंद्र नवले,उप विभागीय अधिकारी मावळ,विक्रम देशमुख तहसीलदार मावळ, कुलदीप प्रधान बीडीओ मावळ,अशोक साबळे मुख्याधिकारी लोणावळा न पा, पल्लवी पिंगळे उप अधीक्षक भूमी अभिलेख,मारुती साळवे तालुका कृषी अधिकारी, सेवक थोरात सहा. गट विकास अधिकारी, अर्चना शेवते, कोषागार अधिकारी हजर होते. तसेच मावळ तालुक्यातील तहसील कार्यालय येथिल अधिकारी व कर्मचारी वर्ग, पोलीस पाटील,मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल स्वस्त धान्य दुकानदार सह नागरिक व इतर विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.. कार्यक्रमाची प्रस्तावना अविनाश पिसाळ महसूलनायब तहसीलदार यांनी केली तर सूत्रसंचालन गणेश तळेकर निवासी नायब तहसीलदार यांनी केले.कार्यक्रमात मार्गदर्शन करताना तहसीलदार विक्रम देशमुख यांनी मागील वर्षात महसूल विभागाने तालुक्यात केलेल्या कामाचा लेखा जोगा मांडला , तसेच पी एम जनमन मधे कातकरी समाजाच्या लोकाना घरासाठी शासकीय जागा उपलब्ध करुन दिल्याचे सांगितले.. तसेच प्रांत साहेब व तहसीलदार यानी जवळपास ५ हजार निकालदेऊन eqjcourt वेबसाइट वर अपलोड केलेच सांगितले. तसेच महसूल सप्ताहात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली .श्री सुरेंद्र नवले यांनी मार्गदर्शन करताना रिंग रोड भूसंपादन करताना केलेल्या कामाचा ,तसेच फेरफार मंजुरी, इ हक्क मधे केलेल्या सुधारणांची माहिती दिली. तसेच येनाऱ्या काळात महसूल विभागासमोरील आव्हाने व कामकाजाची दिशा याबाबत सांगितले.. तसेच महसूल विभागाच्या मवाळ तालुक्यातील कर्मचारी अधिकारी यांच्या कामाचे कौतुक केले.कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी,मंडळ अधिकारी,तलाठी कोतवाल यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.आपत्ती काळात केलेल्या कामगिरी बद्दल पोलीस पाटील,शिवदुर्ग रेस्क्यू टीम,वन्यजीव संस्था , पार्डे रेस्क्यू टीम,महाड यांचाही सन्मान करण्यात आला. कुंडमला येथील दुर्घटनेत रेस्क्यू करता मदत करणाऱ्या स्थानिक आपदा मित्र यांचा सन्मान करण्यात आला.







