तळेगाव लायन्स क्लब निर्मित नैसर्गिक जॉगिंग ट्रॅक लोकार्पण सोहळा संपन्न


मावळ मराठा न्यूज़ :- तळेगाव लायन्स क्लब निर्मित नैसर्गिक जॉगिंग ट्रॅक लोकार्पण सोहळा संपन्नया सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानी लायन अनिकेत काळोखे होते . सेक्रेटरी सुचेत्रा चौधरी,ट्रेझरर प्रकाश पटेल- उद्घघाटक लायन्स क्लब शिवनेरी जुन्नरचे झेड सी लायन शिरीष जठार, प्रकल्प प्रमुख, ॲड.लायन मनोहर दाभाडे पीडीजी लायन दीपकभाई शहा शैलेश शहा महेश शहा ज्येष्ठ लायन शालिग्राम भंडारी- ला शेखर चौधरी आणि इतर सर्व लायन सभासदांच्या उपस्थितीत हा अत्यंत कार्यक्रम पार पडला.अध्यक्षीय भाषणात लायन अनिकेत काळोखे यांनी प्रमुख पाहुण्यांचे आणि उपस्थित मान्यवरांचे मनःपूर्वक स्वागत केले. प्रकल्प प्रमुख लायन ऍड मनोहर दाभाडे यांनी काळाची गरज आणि लायन कावले स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा समन्वय साधून आपण क्लबची परवानगी घेऊन आपण हा प्रकल्प पूर्ण करू शकलो हे मी माझे भाग्य समजतो या शब्दात क्लब विषयीची आपली कृतज्ञता व्यक्त केली. हा नैसर्गिक जॉगिंग ट्रॅक सकाळी सहा ते नऊ आणि संध्याकाळी पाच ते आठ पर्यंत नागरिकांना चालण्याचा व्यायाम करण्यास उपलब्ध राहील असे पुढे आपल्या प्रास्ताविकात त्यांनी विशद केले. या स्तुत्य उपक्रमाचं उद्घघाटन करण्यासाठी खास नारायणगावहून झेड सी लायन शिरीष जठार आपल्या क्लबच्या अध्यक्ष बरोबर आले होते. त्यांच्या शुभहस्ते या उपक्रमाचं उद्घघाटन झाल्यानंतर त्यांनीही लायन्स क्लब तळेगावच्या या स्तुत्य उपक्रमाचे भरभरून कौतुक केलं आणि शुभेच्छा दिल्यात. डॉक्टर या नात्याने ज्येष्ठ लायन डॉक्टर भंडारी यांनी कुठल्याही वयात आपल्या शारीरिक आणि मानसिक उत्तम आरोग्यासाठी सहज करता येण्यासारखा व्यायाम म्हणजे प्रत्येकाने रोज ३० मिनिटे तरी चालणे हा होय. तळेगाव लायन्स क्लबने आज हा जॉगिंग ट्रॅक लोकार्पण करून तळेगावकरांना ही अति उत्तम अशी दिवाळी भेटच देऊन आपलं सामाजिक दायित्व सिद्ध केलेले आहे या शब्दात आपले मनोगत लायन डॉक्टर भंडारींनी व्यक्त केले. या अत्यंत स्तुत्य उपक्रमास तळेगाव आणि शिवनेरी जुन्नर क्लबचे खालील लायन पदाधिकारी उपस्थित होते.




