मनसेच्या ठिय्या आंदोलनानंतर प्रशासनाला खळबळून जाग,लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या कमानीचा विषय मार्गी



मावळ मराठा न्यूज़:- लोणावला, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री.भारत रमेश चिकणे यांच्या अध्क्षतेखाली आज मनसेने लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या कमानीचा विषय मार्गी लावला. लोणावळा नगरपरिषदने लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या कमानीचा ठराव एकमताने मंजूर केला होता. तरी सुद्धा प्रशासन कमानीचा विषय मार्गी लावत न्हवती. परंतु उद्या लोकशाही अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून मनसेने आज कमानीचा विषय नगरपालिकेत लावून धरला आणि कमानी चे काम चालू करूनच मनसे ने आंदोलन मागे घेतले. या आंदोलनास उपस्थित श्री.प्रकाश भाऊ हजारे,मातंग समाजचे अध्यक्ष श्री.सोमनाथ बोभाटे ,श्री.निखिल भोसले,श्री.अमित भोसले,श्री.दिनेश कालेकर,श्री.अभिजीत फासगे,सौ.दीपमाला ताई बोभाटे,श्री.अजिंक्य बोभाटे,श्री.निलेश लांडग,श्री.आकाश लोंढे,श्री.संदीप बोभाटे तसेच याप्रसंगी लोणावळा शहरातील मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.




