अनुरव साहित्य प्रेरणा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक बाबू डिसोजा यांना प्रदान आणि अनुरव दिवाळी अंक प्रकाशन

मावळ मराठा न्युज -आनंदनगर,दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी कलाश्री भवन सिंहगड रोड येथे कलानुरव कल्याणकारी सामाजिक. संस्थेद्वारा अनुरव साहित्य कला, क्रीडा अकादमीचा ८ वा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा झाला.यावेळी अनुरव प्रकाशनाद्वारे प्रकाशित होणाऱ्या “अनुरव” दिवाळी अंकाचे प्रकाशन व दरवर्षी प्रमाणे देण्यात येणारा स्व.गुंडेराव कुलकर्णी व स्व.लक्ष्मणराव कल्याणकर यांच्या स्मरणार्थ असणारा “अनुरव साहित्य प्रेरणा पुरस्कार” ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार मा.बाबू डिसोजा याना मा.जयंत भिडे मा.मंदाताई नाईक,मा.रविंद्र नेर्लेकर,मा.मिलिंद पानसरे, मा.अतुल कुलकर्णी व कलानुरव कार्यकारिणी यांच्या हास्ते प्रदान करण्यात आला.पुरस्काराचे स्वरूप रोख रुपये ११,०००/-, सन्मानचिन्ह, पुणेरी पगडी, शाल व श्रीफळ असे आहे.या प्रसंगी अनुरव संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्तमरित्या संगीत कला सादर केली तर डॉ. पं. रविंद्र यादव यांनी त्यांच्या गायनरंग मैफली द्वारे सुमधुर रंगछटा दर्शविल्या. संस्थेचे प्रास्ताविक अध्यक्षा डॉ.अनुजा कल्याणकर यांनी केले तर या समारंभाचे निवेदन आणि सूत्रसंचालन डॉ.सतीश कुलकर्णी यांनी सरसपणे केले. अनुरव च्या साहित्यिक परिवारासह संगीत शिकणाऱ्या मुलांचे पालक , संगीत रसिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page