३ डिसेंबर रोजी पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिना निमित्त पत्रकारांची आरोग्य तपासणी

मावळ मराठा न्यूज,लोणावळा,३ डिसेंबर रोजी पत्रकारांची मातृ संस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिना निमित्त मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनी म्हणजे ३ डिसेंबर २०२२ रोजी राज्यातील १० ,००० पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याचा संकल्प परिषदेच्या वतीने केला आहे. हे अभियान यशस्वी झाले तर हा विश्वविक्रम होऊ शकतो.तेव्हा आपल्या पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न सर्व तालुका संघांनी आरोग्य शिबिराचे आयोजन करावे. सर्व तालुकाध्यक्षांनी आरोग्य शिबिरे आयोजित करून त्यासंबंधीची माहिती व फोटो पुणे जिल्हा पत्रकार संघाकडे पाठवावेत. पत्रकारांचे आपल्या आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होते.वेळीच काळजी न घेतल्यानं आणि दुर्लक्ष केल्याने छोटे आजार नंतर बळावत जातात आणि मग हाताबाहेर जातात हे टाळण्यासाठी परिषद आरोग्य तपासणी शिबिरं घेते. यावर्षी राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका पत्रकार संघाच्यावतीने एकाच दिवशी ही शिबीरं आयोजित करण्यात येणार आहेत. स्थानिक पातळीवर रोटरी, लायन्स क्लब तसेच स्थानिक डॉक्टर मित्रांच्या मदतीने ही शिबिरं घ्यावीत आणि पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी करण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या तपासणीतून कोणी गंभीर आजारी असल्याचे स्पष्ट झाल्यास मंगेश चिवटे यांच्या नेतृत्वाखालील सरकारी आरोग्य कक्ष तसेच परिषदेचे आरोग्य विभाग प्रमुख दीपक कैतके यांच्या माध्यमातून पुढील उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. सर्व तालुका संघांनी ३ डिसेंबर रोजी आरोग्य शिबीरं घेऊन परिषदेचा संकल्प पूर्णत्वास न्यावा असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख यांनी केले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page