श्री एकविरा देवी,दुर्गा परमेश्वरी यांच्या वतीने २४ एप्रिलला २१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा होणार संपन्न!

मावळ मराठा न्युज – कार्ला,श्री एकविरा देवी, दुर्गा परमेश्वरी यांच्या वतीने शुकवार दि २४/०४/२०२६ रोजी २१ जोडपी यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न होणार आहे याबाबत नुकतीच समितिच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. हे समितीचे १४ वे वर्षे आहे. समितीने २०१३ पासुन गेली १३ वर्षापासुन आतापर्यत १६८ जोडयांचे विवाह केले आहेतसदर विवाह सोहळा दुर्गा परमेश्वरी मंदिर प्रांगण, कार्ला येथे संपन्न होणार आहे. श्री एकविरा देवी, दुर्गा परमेश्वरी समितीचे सन २०२६ चे अध्यक्षः रोहिदास हुलावळे, कार्याध्यक्ष शामराव गायकवाड,कार्यप्रमुख : बाळासाहेब उर्फ मारूती येवले,उपाध्यक्ष : भरत मानकर, किसन राणे,सचिवः जयराम आंबेकर, सहसचिवः हनुमंत आहेर,खजिनदार: विश्वेश आवटी, सहखजिनदारः बाळासाहेब डुबे असणार आहेत समितीच्या वतीने वधु-वरासवरास : साखरपुडा ड्रेस, लग्नाचा पोशाख, फेटा, बाशिंग,मनगटी घदयाळ इत्यादी वधुस : सोन्याचे मंगळसुत्र, जोडवी पैजण, नथ मनगटी घड्याळ लग्नाची शॉल, साखरपुडा साडी हळदीची साडी, चुनरी झाल झेंडाः फॅन, मिक्सर, कुकर, शिलाई मशीन, पॅन सेट इस्त्री, संसारपयोगी भांडी, प्रवासी बॅग इ.देण्यात येणार आहे. विवाह सोहळ्यानंतर सर्व जोडप्यांची वांजत्री ढोललेझीम सह मोठ्या थाटात मिरवणूक काढण्यात येणार आहे.या कार्यक्रमादरम्यात वरहाडी मंडळीस उत्तम नास्ता/जेवणाची सोय. प्रत्येक वधु वरास, वरडयासाठी दिवसभरासाठी रूमची व्यवस्था आर्कषक मंडप, स्टेज व रोषणाई देखील करण्यात येणार आहे.या समाजपयोगी कार्याबद्दल समितीला आतापर्यत विविध संस्थांकडुन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.आजपर्यत ७५ सभासद दरवर्षी वर्गणी काढुन सोहळा साजरा करतात. कार्ला परिसरातील अनेक उदयोजकाकडुन सोहळ्यास सहकार्य मिळत असते.समाजातील गोर गरीब, शेतकरी, कष्टकरी यांनी आपल्या पाल्यांच्या लग्नाला कर्ज न काढता, शेती न विकता आमच्या सोहळयात लग्न करावी नागरिकांना आवाहन समितीकडून करण्यात आले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page