लायन्स क्लब ऑफ लोणावळ्याच्या वतीने आदिवासी समाजासाठी सामूहिक विवाह सोहळा संपन्न








मावळ मराठा न्युज -लोणावळा, दि. २५ फेब्रुवारी २०२६ —लायन्स क्लब ऑफ लोणावळ्याच्या सदस्यांच्या मनातील संवेदना आणि सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा समाजासमोर अधोरेखित झाली. दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी क्लबच्या वतीने अत्यंत पवित्र, भावनिक आणि समाजोपयोगी असे कार्य करत आदिवासी समाजातील तीन जोडप्यांचे विवाह लावून देण्याचा मंगल सोहळा संपन्न केला.आदिवासी समाजात सामूहिक विवाहसोहळा ही आजच्या काळाची गरज आहे.आदिवासी कुटुंबात जन्माला येणे हा त्यांचा काही गुन्हा नाही. परिस्थिती कठीण असली तरी त्यांची मूल्ये अत्यंत समृद्ध आहेत. हे सर्वजण निर्व्यसनी असून प्रामाणिकपणे काबाडकष्ट करून उदरनिर्वाह करतात. मेहनत व धडपड करून स्वतःचा संसार थाटण्याचा प्रयत्न करतात. मात्र आर्थिक विवंचनांमुळे अनेकांची विवाहाची स्वप्ने अपूर्ण राहतात आणि कित्येक मुलामुलींना लग्नाशिवायच आयुष्य व्यतीत करावे लागते.अशा प्रामाणिक, होतकरू व कष्टाळू मुलामुलींची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी लायन्स क्लब ऑफ लोणावळ्याने पुढाकार घेतला व मोलाचे योगदान देत त्यांच्या संसाराला उजाळा देण्याचे कार्य केले. नवदांपत्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर उमटलेली आनंदाची झळाळी हीच क्लबची खरी कमाई ठरली.या सोहळ्यास लायन्सचे पुणे जिल्ह्याचे प्रांतपाल PMJF लायन राजेश अगरवाल यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन अत्यंत प्रेरणादायी ठरले. तसेच लायन उमेश अग्रवाल यांची उपस्थितीही उल्लेखनीय होती. अध्यक्षा लायन साधना टाटिया यांच्या सक्षम नेतृत्वाखाली व सेक्रेटरी सारीका , अगरवाल , खजिनदार सुमीत सर्व लायन सदस्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.या उपक्रमासाठी विजय मानकर, स्वरूप सूद, आनंद खंडेलवाल,पिंकी व रवी वर्मा,कविता व विकास नय्यर,अर्पणा व सचिन पारख, लता गुप्ता,संतोष अगरवाल,संगीता व शिव अगरवाल, राजू मोरे,महेंद्र कांकरिया,मुबश्शीर काॅन्ट्रक्टर, साधना टाटिया,सारिका व आनंद अगरवाल, विशाखा गोळपकर , श्रुती शाह,अतुल मेहता, बक्षी अंकल,पुनिता व सुमित भडेशिया,नवीन भुरट,गिरीश पारख,सहादू मानकर,वसुधा पाटील,सागर बोहरा तसेच पद्मावती नर्सिंग होमचा संपूर्ण स्टाफ आणि एमजेएफ लायन डॉ. सीमा शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या सामाजिक जाणीवेतून आणि बांधिलकीतून हा अत्यंत स्तुत्य उपक्रम यशस्वीपणे साकार झाला.लायन्स क्लब ऑफ लोणावळ्याच्या वतीने या तीन नवविवाहित जोडप्यांना संसारोपयोगी साहित्याचे मोलाचे दान करण्यात आले. या देणगीत प्रामुख्याने कपडे,साड्या,ड्रेसेस,दागिने, भांडी तसेच घरगुती वापरासाठी आवश्यक सर्व संसारोपयोगी वस्तूंचा समावेश होता.तसेच सर्व वऱ्हाडी मंडळींसाठी अत्यंत रुचकर व स्वादिष्ट मिष्टान्न भोजनाची व्यवस्था करण्यात आली.हा पवित्र विवाहसोहळा ओळकाईवाडी येथील ओळकेश्वर मंदिरामध्ये मंगल वातावरणात संपन्न झाला.अशा समाजोपयोगी कार्यातून लायन्स क्लब ऑफ लोणावळा समाजातील वंचित घटकांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.



