शिवदुर्गच्या मार्गदर्शनखाली मोठ्या उंचीवर विजय मिळवा मोहीम अडचणींवर मात करत केली फत्ते – एक आगळा अनुभव

मावळ मराठा न्यूज, लोणावळा:- शिवदुर्ग मित्र लोणावळा प्रत्येक वेळी आव्हानात्मक मोहीमा आयोजित करत असते . ह्या वर्षी पण अशीच एक अगळी वेगळी मोहीम आयोजित केली होती . शिवदुर्ग क्लायंबिंग वाॅलवर जी मुल क्लायंबिंग करतात. त्यांच्या साठी खास ही मोहीम होती. ही मुल म्हणजेच शिवदुर्ग ची तिसरी पिढी ही मोहीम लिड करणार होती . ही मोहीम आयोजित करण्याचा उद्देश म्हणजे नक्की ट्रॅडीशनल क्लायंबिंग काय आणि बिग वाॅल क्लायंबिंग चा अनुभव द्यायचा होता. कारण सध्या न वीन येणारे क्लायंबर शक्यतो स्पोर्ट क्लायंबिंग किंवा मल्टिपिच क्लायंबिंग जास्त करतात. त्यामुळे ह्या टीम ला हा नवा अनुभव मिळावा हा उद्देश. त्यामुळे ही सदर मोहीम आयोजित केली.होती मोहीम खुप जोखमीची आणि जबाबदारीची होती . कारण बरयाच गोष्टी मॅनेज करायच्या होत्या कारण ही सर्व मुल वीस वर्षांच्या खालील होती आणि विशेष म्हणजे ह्यात एका मुलीचा समावेश होता . एकुण सात जणांची क्लायंबिंग टीम आणि बाकी सपोर्ट टीम होती . त्यांना कोकणकडया च्या नळीच्या वाटेच्या बाजूची रिज क्लायंबिंग करायला सांगितली. त्यांनी पण ही जबाबदारी घेतली. मोहीमेचा कालावधी तीन महिन्याचा होता . ह्यात त्यांच , फिजिकल ट्रेनिंग, टेक्निकल ट्रेनिंग , रेकी , तसेच फंडीग जमा करणे . हे सगळ तीन महीन्यात करायच होत. टीम ची ट्रेनिंग करूण घेण्याची जबाबदारी सचिन गायकवाड सरांनी घेतली. नोव्हेंबर च्या १५ तारखेला रूट ची दोन्ही बाजुने यशस्वी रेकी करण्यात आली बेस कॅम्प आणि पाण्याचा स्त्रोत कुठ कुठ आहे. ह्याची सगळी रितसर पाहणी करण्यात आली . मोहीमेची तारीख ठरली. २ डिसेंबर २०२२ ते १२ डिसेंबर २०२२ असा दहा दिवसाचा कालवधी ठेवला कारण ह्या कालावधीतच पाणी मिळणार होत त्यानंतर पाणी मिळण कठीण होत. टीम मध्ये हर्ष तोंडे ,आदित्य पिलाने,रितेश कुडतरकर, आयुष वर्तक,ओम हारसुले ,सिध्देश निसाळ, हर्षल चौधरी,रतन सिंग आणि श्रृती शिंदे ह्याचा समावेश होता. इक्विपमेंट,रेशन खरेदी ह्या सगळ्या गोष्टींची तयारी करण्यात आली आणि टीम २ डिसेंबर ला दुपारी वाल्हीवरे, बेलपाडा गावात रवाना झाली. गावात पोहचुन दुसरया दिवशीची तयारी केली.आणि ३ तारखेला सकाळीच टिमने बेस कॅम्प कडे कुच केल. साधारण एक तासाचा ट्रेक करून टीम बेस कॅम्प ला पोहचली . बेस कॅम्प सेट करण्यात आला . त्यानंतर क्लायंबिंग टीम ने क्लायंबिंग ची तयारी केली . साधारण दहा वाजता क्लायंबिंग रूट ची पूजा करून चढाईला सुरूवात झाली . पहील्या दिवशी रितेश कुडतरकर आणि हर्ष तोंडे या दोघांनी सुरवात केली . सुरवाताची चढाई ही समिश्र पद्धतीची होती माती ठिसुळ दगड त्यामुळे त्यांना सावध पणे एक एक पाऊल टाकाव लागत होत . पहील्या दिवशी एवढी जास्त मजल गाठता आली कारण चढाई थोडी उशीरानेच चालू झाली होती. तरी पहील्या दिवशी ११० मीटर पर्यंत मजल गाठली. आणि पहील्या दिवसाची चढाई तिथेच थांववावी लागली. आणि बेस कॅम्प ला सगळी टीम परत आली. आणि रात्री जेवन वगैर करून दुसऱ्या दिवसाच नियोजन करण्यात आल . मुल हे सगळ पहिल्यांदाच करत असल्यामुळे काही गोष्टी लवकर क्लीअर होत नव्हत्या कारण बिग वाॅल क्लायंबिंग मध्ये खुप संभाव्य धोके असतात त्याचा बारकाईनं विचार करून क्लायंबर ला क्लाइंब कराव लागत. ४ तारखेला सुद्धा हर्ष आणि रितेश सुरवात केली . आणि एक अंगावर येणार टप्पा पार करून १०० मीटर चा व्हेजिटेशन टप्पा त्यांना पार करायचा होता . हे सगळ करत त्यांना रोप मॅनेजमेंट आणि इक्विपमेंट रिग करून घेणे यात दमछाक होत होती. यातच दुपार झाली. आणि तिथे थांबुन दुपारी दुसरया जोडीला पुढची चढाई करण्याचा निर्णय घेतला पुढची जोडी आदित्य पिलाने आणि आयुष वर्तक यांनी पुढचा टप्पा चढाईला सुरूवात केली तो टप्पा दिसताना खुप सोपा दिसत होता पण ९० अंशात होता . त्यामुळे वेळ जाणार होता आदित्य ने सुरूवात केली मजल दरमजल करत ५ वाजे पर्यंत आरामात दोन मेखा, पिटॉन, आणि तीन बोल्ट वापरून स्वतःला सुरक्षित करत ४० मीटर पर्यंत मजल मारली . आणि दिवसाची चढाई थांबवली आणि बेस कॅम्प ला जाण्याचा निर्णय घेतला. पण हे सगळ करताना अजून एक ॲक्टिविटी वाढत होती ती म्हणजे जस जस हे वर सरकत होते तेवढ जुमारिंग करून ह्याना पुढच क्लायंबिंग कराव लागत होत. त्यात टीम ची खुप कसरत होत होती . पण संयम ठेवून सगळे व्यवस्थित करत होते . दुसर्‍या दिवशी म्हणजे ५ तारखेला परत ह्याच जोडगोळीने सुरवात केली . आदित्य आयुष आणि श्रुती त्या दिवशी आयुष ने लीड करायचा निर्णय घेतला आणि श्रुती त्याला बिले करत होती तर आदित्य ह्याना गाईड करत होता. तसेच सचिन सर हे सगळ निरीक्षण करत होते. आयुष ने एक क्रॅक चा पॅच आणि एक छोटा अंगावर येणारा पॅच लिलया पार केला फ्रेन्ड्स चा आणि दोन बोल्ट चा वापर करून स्वतःला सुरक्षित करून नवीन पीच ओपन केल. आणि त्यानंतर श्रुती ने पुढचा टप्पा करण्याचा निर्णय घेतला आणि पुढे क्लायबिंग चालु केले . तिने पण चांगली १ फ्रेन्ड्स आणि 1 पिटॉन वर जवळ जवळ ३० मीटरची चढाई पुर्ण केली . आणि वर एक झाडाला एंकर करून पीच पुर्ण केल. एवढ्या लहान वयात traditional climb करणारी ही पहीलीच टीम असावी नियोजन बद्ध पद्धतीने सगळ चालु होते त्या नंतर नेमका असा प्रोब्लेम झाला की ड्रील मशीन ची बॅटरी संपली आणि पुढची चढाई करण श्रुती ला अवघड जात होत . आणि वेळ खुप कमी उरला होता . अंधार पडला असता त्यामुळे योगेश उंबरे नी असा निर्णय घेतला की मशीन ची बॅटरी येईपर्यंत हॅन्ड पंच चा वापर करून पुढची scree प्रकारची चढाई करायची ठरवल. पुढ चढाई सुरू ठेवून जवळपास योगेश ने तासा भरात . १४५ मीटर चा टप्पा पुर्ण करून तो दिवस तिथे संपवला आणि बेस कॅम्प ला जाण्याचा निर्णय घेतला . सर्व टीम ६ वाजता बेस कॅम्प ला आली आणि दुसर्‍या दिवशीच नियोजन केल गेल . जवळ जवळ आठशे फुटाची समिश्र पध्दतीची चढाई बाकी होती आणि मग समीट होत ६ डिसेंबर चा दिवस उजाडला आणि परत पुढची तिघ म्हणजे हर्ष, रितेश आणि रतन ह्या तिघानी सकाळी ४ वाजताच क्लायंबिंग पॅच कड केल आणि पुढची चढाई सुरू केली नंतर बाकी टीम हळु हळु एक एक करून वर येत होती. समीट होण्याचा अंदाज आला होता . हर्ष आणि रितेश नी आपल्या कौशल्याच्या जोरावर बाकी टीम वर येई पर्यंत त बरीच मजल मारली होती . बोल्ट पिटॉन, फ्रेन्ड्स चा वापर करत करत ९० अंशाच्या कोनातील चढाईला दोघे भिडले होते साधारण २५० मीटर चढाई केल्यानंतर उन्हाच्या तडाख्याने दोघांची चढाई थोडी स्लो झाली . आणि थोड रोप मॅनेजमेंट मध्ये पण वेळ गेला दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास समीट आपल्या आवाक्यात आल अस वाटल .आणि सचिन सरांचा काॅल घेऊन समीट पुस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आणि पुढची चढाई हर्ष आणि रितेश ने कायम ठेवली . टीम इंच इंच वर सरकत होती . आणि बरोबर समीट च्या आधी वीस फुटांचा अंगावर येणारा एक पॅच नी ह्या दोघांना पेचात पाडल .पण ह्या रितेश ने तो पॅच पण एक बोल्ट आणि फ्रेन्ड्स आणि पिटॉन च्या सहाय्याने तो टप्प्या थोडा वेळ घेऊन पुर्ण केला . मग एका मागे एक जण वर सरकत होता . आता समीट फक्त वीस फुटांवर होत पण त्यापण अजुन एक चांगलाच ओपन बुक पॅच होता मग समीट होत. कुठलही यश हे सहजा सहजी मिळत नाही याचा प्रत्यय टीम ला येथे आला. तो पर्यंत ५:३० वाजले होते अंधार पडायला थोडा वेळ बाकी होता . काही झाल तरी समीट नक्की होत. रितेश आणि हर्ष पुढे पुढे सरकत होते त्या पाठोपाठ बाकी टीम मार्गक्रमण करत होती बरोबर ६:३० वाजता सर्वाच समीट वर पाऊल पडल. आणि समीट चा काॅल बेस कॅम्प ला दिला . पण जोपर्यंत सर्व टीम बेस कॅम्प ला सुरक्षित पोहचत नाही तो पर्यंत समीट ग्राह्य धरल जात नाही समीट टीम ने समीट भारताच तिरंगा व महाराष्ट्राचा भगवा झेंडा फडकवून आनंद व्यक्त केला . थोडी फार फोटोग्राफी करून एक एक करून खाली उतरायला सुरूवात केली . महाराष्ट्रातील गिर्यारोहण क्षेत्रातील खुप मोठी आणि अभिमानास्पद कामगिरी टीम ने केली होती . एक नवीन आव्हानात्मक क्लायंबिंग रूट महाराष्ट्रातील गिर्यारोहकांसाठी खुला झाला होता. मजल दरमजल करत टीम पहाटे ३ वाजता बेस कॅम्प ला पोहचली होती . सगळेच खुप दमले होते. सचिन सर वाट पहात होते. आता अजुन एक सर्वात महत्वाच काम बाकी होत . ते म्हणजे वायंडप ७ तारखेच्या सकाळीच सिद्धार्थ आढाव, सुरज वरे , योगेश उंबरे ह्यानी वांयडप ला सुरूवात केली . वायंडप हा प्रकार सर्वात कठीण आणि किचकट असतो . तिघानी वायंडपला सुरवात सहा तास हे वायंडप मध्येच गेले आणि दुपारी ३ वाजता हे तिघे क्लायंबिंग बेस ला सुरक्षित पोहचले . तो पर्यंत आमचे टीम सुनील गायकवाड, राजुदादा कडु , महेशदादा मसने , आनंद गावडे सर , वैष्णवी भांगरे , आबोली वाकडकर, दुर्वेश साठे हे क्लायंबिंग टीम ला भेटायला आले होते . मोहीम यशस्वी झाली होती. तीन महीन्याची मेहनतीला यश आल होत. शिवदुर्गची पहीलीच अशी क्लायंबिंग मोहीम होती . की रोहीत तु नव्हतास खुप आठवण आली आणि खुप उणीव भासली , ह्या मोहीमेत सर्वानीच महत्त्वपूर्ण भुमिका बजावली मोहीमेसाठी ज्यांनी ज्यांनी साहीत्य रूपी व आर्थिक स्वरूपात मोलाचे सहकार्य केले . शिवदुर्ग मित्र परिवार ,कुसगाव ग्रामपंचायत सौ अश्विनीताई ज्ञानेश्वर गुंडश्री सुरजभाऊ दत्ता केदारी श्री दिव्येश मुनी सर श्री दत्ताभाऊ येवले श्री नितीन अप्पा दुर्गे श्री कैलास घोणे काका श्री श्रीधर पुजारी सौ माधुरी पिंगळे मॅडम सौ सुरेखा ताई जाधव आमच्या प्रत्येक मोहीमेत सदैव सहकार्य करणारे आमचे हक्काचे नंदुदादा चव्हाण ,भुषण पेंडसे श्रीपाद सपकाळ ,सुरेश भाई गीद ,निसर्गमित्र पनवेल आम्ही गिर्यारोहक डोंबिवली,तुहीन सातारकर यांनी विशेष केले.हर्ष,रितेश,आदित्या,आयुष,श्रुती,रतन,सिद्धेश,हर्षल या सर्व विद्यार्थी ने कोकण कडा २५७५ फूट उंची गाठून् कुसगाव बुद्रुक चे नव खूप मोठे केले त्याबद्दल त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page