आरोग्य दूत नंदकिशोर खंडेलवाल आणि लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळाचा कामशेत येथील तंबोरे परिवाराला मदतीचा हात

मावळ मराठा न्युज – कामशेत,हर्षद विष्णु तंबोरे यांचा दि. २१ /१० /२०२२ रोजी भीषण अपघात झाला. दि. २०/१०/२०२२ रोजी हर्षद विष्णु तंबोरे,शुभम विष्णु तंबोरे,जावई अतुल बाळासाहेब मेदगे हे तिघे जण दिवाळीसाठी फूले आणण्यासाठी पुणे पुणे गेले होते दि. १९ /९०/२०२२ रोजी फुले घेऊन येताना पुनावळे रावेत येथे अपघात झाला. अपघात असा झाली कि मागुन भरधाव वेगाने किया ही गाडी त्यांना ओव्हरटेक करित असताना किया त्या गाडीचा धक्का त्यांच्या कैरी या टेम्पोला लागला त्यामुळे डाव्या साईड ला उभ्या असलेल्या कैटेनर मध्ये यांची गाडी घुसली, पुढे तिच‌जण बसलेले असताना गावातील ड्रायव्हर माझी दोन मुले कुहर्षद विष्णू तंबोरे शुभम विष्णु तंबोरे हे अत्यंत गंभीर जखमी झाले. जावई अतूल बाळासाहेब अतुल बाळासाहेब मेदगे हे जागेवरच मरण पावले. त्यानंतर उपचारासाठी शुभम व हर्षदला विश्व नित्यसेवा हॉस्पीटल कार्ला येथे अॅडमिट केले. उपचारानंतर शुभम महिन्या भरात व्यवस्थीत होइन घरी आला. परंतु हर्षदला जास्त गंभीर मार लागल्यामुळे (हेड एंजुरी) तो कोमात गेला. व त्यात त्याचे चार ते पाच ऑपरेशन झाले व तो चार ‌महिने हॉस्पीटल मध्येच अॅडमीट होता. त्यात जवळजवळ बारा ते पंधरा लाख रूपये खर्च झाला. परंतु तो काही बरा झाला नाही. व घरी आणल्यानंतरही जवळ जवळ पाच ते सहा लाख खर्च झाला इतके होउन ही हर्षद बरा झाला नाही. ही खेदाची गोष्ट आहे. २२ फेब्रुवारी रोजी हर्षल तंबोरे कामशेत या चिमुकल्यास लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळाचे प्रेसिडेंट कांता ओसवाल,डॉ.पोपट ओसवाल लायन ऍड. प्रफुल लुंकड,मनोज लुंकड,खंडेलवाल मेडिकल्सचे मालक आरोग्य दूत नंदकिशोर खंडेलवाल,यांनी त्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेट दिली. नंदकिशोर खंडेलवाल यांच्या तर्फे १ वर्ष पुरेल एवढे डायफर देण्यात आले. आणि काही आर्थिक मदत ही करण्यात आली.यावेळी लोणावळा स्टेशन चे माजी स्टेशन मास्टर बी एच रजपूत यांचेही सहकार्य लाभले. तरी या कुटुंबावर संकटाचा डोंगर कोसळला असून या परिवाराला हर्षद च्या जीव वाचवण्यासाठी आणि त्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे तरी समाजातील दानशूर व्यक्तींनी त्यांना खालील हर्षद च्या आईच्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकेतील खात्यात आपण मदत थेट पाठवू शकतात असे कळकळी चे आवाहन तंबोरे कुटुंबाकडून मावळ मराठा न्यूज ला करण्यात आले आहे.

संपर्क – सौ मनीषा विष्णू तंबोरे बैंक ऑफ महाराष्ट्र,कामशेत,खाते क्रमांक ६००३०७११८२९

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page