शिवसेवा प्रतिष्ठान संस्थेच्या संस्कार वर्गाच्या लहान मुलांचा लोणावळा शहरात गणेशोत्सवा निमित्त अभिनव उपक्रम



मावळ मराठा न्यूज़:- लोणावला, भाद्रपद शुध्द चतुर्थी ते अनंत शुध्द चथुर्दशी ह्या कालावधीत लोणावळ्यातील प्रमुख सार्वजनिक मंडळा समोर ,श्लोक, गणेश स्तोत्र, अथर्वशीर्ष पठण आरती, भजन, जप, गजर असा नित्यक्रम संस्थेच्या मुंलानी केला.रोज सांयकाळी ६.३० ते ७.१५ .हा उपक्रम केला गेला..श्री गणेश मंदिर, श्री हनुमान मंदिर, श्री शिवाजी मित्र मंडळ, महाराणा प्रताप मंडळ, भाजी मंडई मंडळ, महाराणा प्रताप मंडळ, रोहीदास मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, तरुण मराठा मंडळ, अशा सर्व प्रमुख मंडळांच्या गणपतीबाप्पा समोर संस्कार वर्गाच्या लहान मुलांनी सादरीकरण केले. खड़ा आवाज, सुस्पष्ट उच्चार, शिस्तबध्द बैठक, छान पाठातर, भक्तीमय वातावरण, सर्वच खुप छान होते…सर्वच गणपती मंडळाचे पदाधीकारी, कार्यकर्ते, गणपती बघण्यासाठी आलेले लोक, पालक सर्वच जण या मुलांचे रोज खुप कौतुक करत होते..गणपती उत्सवाच्या दहा दिवसात शिवसेवा प्रतिष्ठान च्या या संस्कार वर्गाच्या ऊपक्रमाची खुप छान चर्चा संपुर्ण शहरभर होती..अशा प्रकारचे उपक्रम मोठ्या प्रमाणात व्हावेत असेही खुप नागरीकांचे म्हणणे होते..श्रीमती रुतुजा मेहता, सौ सुचेता खळदकर, यांनी या मुलांकडुन खूप छान तयारी करून घेतली होती..शिवसेवा प्रतिष्ठान चे श्री राजेश येवले, राजेश कामठे, प्रमोद देशपांडे, प्रशांत हरिचंद्रे, धनंजय चंद्रात्रे आदी कार्यकर्ते कार्यक्रमात उपस्थीत होते.




