विधानसभा सभा निवडणुकीचे पडघम ऑक्टोबर २०२४ मध्येच,निवडणूक पूर्व तयारीला लागा,राज्य आयोगाचे कर्मचाऱ्यांना आदेश




मावळ मराठा न्युज :- महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संपत असल्याने विधानसभेच्या निवडणुका येत्या ऑक्टोबर २०२४ रोजी घेण्यात येणार असून निवडणूक पूर्व तयारीला लागा असे आदेश राज्यातील आयोगाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि निवडणूक आयोगाचे वरिष्ठ जम्मू काश्मीर या ठिकाणी आगामी निवडणुका घेतल्या जाणार असून येत्या दोन दिवसात म्हणजेच २५ जून पासून प्रत्यक्ष आयोगाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. महाराष्ट्र २६ नोव्हेंबर, हरियाणा ३ नोव्हेंबर, झारखंड ५ जानेवारी २०२५ रोजी विधानसभेचा कार्यकाल संपत आहे. नवीन सरकार स्थापनेचा दृष्टीने चार ही राज्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने घरोघरी जाऊन निवडणूक याद्या अद्ययावत करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून मतदान केंद्रावरील अडचणी दूर कराव्यात असे निर्देश देण्यात आल्याचे सांगण्यात येते. दिवाळी पूर्वीच विधानसभा निवडणुका घेतल्या जातील असा अंदाज निवडणूक आयोगाचे वरिष्ठ अधिकारी व्यक्त करीत आहेत.




