लायन्स क्लब ऑफ लोणावळा,कऊर परिवार पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने किराणा साहित्य व खाऊ वाटप

मावळ मराठा न्युज :-आज दिनांक ०८/११/२०२४ रोजी लायन्स क्लब ऑफ लोणावळा आणि कऊर परिवार पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कुमारी स्वरा कऊर व कुमारी नायरा कऊर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपर्क बाल आशा घर नांदगाव येथील मुलांसाठी किराणा साहित्य व खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून लायन पद्मा गुप्ता अध्यक्षा – लायन्स क्लब लोणावळा, लायन नलिनी पवार सचिव लायन्स क्लब लोणावळा, श्रीमती निर्मला कऊर, श्री निलेश कऊर, सौ. गौरी कऊर, श्री नंदकिशोर खंडेलवाल तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री नंदकिशोर खंडेलवाल यांचे विशेष सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री मनोज गवळी यांनी केले, त्याचप्रमाणे बालकांच्या वतीने विद्यार्थी प्रतिनिधी म्हणुन कु.साईराज राऊत याने वाढदिवसाच्या निमित्ताने कुमारी स्वरा व कुमारी नायरा यांना शुभेच्छा देवून आभार व्यक्त करून कार्यक्रम संपन्न झाला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page