‘लेक लाडकी योजने”मुळे मुलींचे सक्षमीकरण आणि सुरक्षेत वाढ होईल – डॉ. नीलम गोऱ्हे


मावळ मराठा न्यूज़ १० ऑक्टोबर २०२३ , नरिमन पॉईंट येथील बाळासाहेब भवन येथे फटाके फोडून आणि ढोल ताशांच्या गजरात शिवसेना महिला आघाडीने जल्लोष करत केले निर्णयाचे स्वागत; मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांचे यावेळी आभार मानण्यात आले. भारतात १००० मुलींच्या पाठीमागे ९४० मुली जन्म घेतात राज्यात ही संख्या ९२९ आहे. याचं कारण म्हणजे बऱ्याचदा मुलींना गर्भातच मारलं जातं, म्हणूनच ही संख्या बदलण्याचं काम सरकारच्या वतीने सातत्याने केलं जात आहे. सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केल्यानुसार मुलगी जन्मली की ५००० रुपये तसेच मुलगी १८ वर्षाची होईपर्यंत एक लाखापेक्षाही अधिकची रक्कम त्या मुलीला मिळणार असल्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. नकोशी असणारी मुलगी ही समाजातील परिस्थिती बदलुन मुलगी देशाचे भुषण आहे. त्यामुळे मुलीला जगण्याची संधी मिळावी या करिता राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सर्वांनी महाराष्ट्रातील स्त्री शक्तीला वंदन म्हणून ही योजना सुरू केली असून त्याची अंमलबजावणी लवकरच होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सदरची योजना लागू केल्याबद्दल उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सरकारचे आभार मानले. याप्रसंगी शिवसेना महिला उपनेत्या सर्व श्रीमती शीतल म्हात्रे, कला शिंदे, शिल्पा देशमुख यांसह शिवसेना महिला आघाडीच्या वतीने नरिमन पॉईंट येथील बाळासाहेब भवन येथे फटाके फोडून आणि ढोल ताशांच्या गजरात शिवसेनेच्या वतीने जल्लोष करत निर्णयाचे स्वागत करण्यात आले .




