लोणावळ्यात कौटुंबिक छळाने महिलेचा मृत्यू,चौघाना अटक

मावळ मराठा न्युज – लोणावळा,लोणावळ्यातील म्हाडा कॉलनी येथे राहणाऱ्या अनया अथर्व कांबऴे वय २३ वर्षे यांचा कौटुंबिक छळ होऊन मृत्यू झाला असून आरोपी- जावई १) अथर्व महेष कांबऴे, मुलीचे सासरे २) महेष कांबळे ,मुलीचे सासु ३) वैषाली महेष कांबळे, मुलीचे नंणद ४) साक्षी महेष कांबळे सर्व सर्व रा. म्हाडा कॉलनी, लोणावळा ता.मावळ जि पुणे यांना अटक झाली आहे.गु.र.नं.१९८ /२०२४ भा.द.वि.क.४९८ (अ ),३०४ (ब )५०४ ,३४ यातील आरोपी मजकुर यांनी यातील फिर्यादीची मयत मुलगी अनया हिच्या लग्नांतर तिचा पती अथर्व महेश कांबळे, सासरे महेश कांबळे, सासु वैषाली महेश कांबळे,नणंद साक्षी महेश कांबळे सर्व रा. म्हाडा कॉलनी, लोणावळा ता.मावळ जि.पुणे यांनी वेळोवेळी मुलगी अनया हिचे कपडयावरून,बोलण्यावरून सतत टोमणे मारून तसेच लग्नामध्ये मान पान केला नसल्याचे कारणावरून व लग्नात पाहीजे तेवढा हुंडा दिला नाही आजुन हुंडा आई वडीलाकडुन घेवुन ये असे मुलगी अनयाला षारिरीक व मानसिक त्रास देवून तिचा जाच व छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केले आहे माझ्या मुलीच्या मयतास कारणीभुत झाले आहेत वगैरे मजकुरचे फिर्यादीवरुन गुन्हा रजि.दाखल केला.गुन्हयाचा वर्दि रिपोर्ट मा. ज्युडी.मँजि. सो कोर्ट वडगांव मावळ यांना रवाना केला.यासंदर्भात मयत महिलेच्या वडिल संजय चंद्रकांत क्षिरसागर वय ५२ वर्षें , व्यवसाय शिवण काम रा.दावडी ता.खेड जि.पुणे यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशन ला फिर्याद दिली आहे.सर्व आरोपी याना अटक करण्यात आली असून सदर गुन्हयाचा तपास स.पो.नि पोवार लोणावळा शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.दाखल अधिकारी-पोसई पाटील.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page