…हेच माझ्या सौंदर्याचे खरे गमक – प्रार्थना बेहेरे

मावळ मराठा न्यूज, (शिवाजी घोडे)पुणे ‘ब्लॉसम पब्लिक स्कूल च्या स्नेह संमेलनामध्ये उदगार पिंपरी( प्रतिनिधी) आयुष्यात हे खूपच कमी आहेत्यात चढ- उतार तर कायमच येत रहातात.निराश न होता आनंदाने संकटाना तोंड द्या. अंतर्मनातील सौंदर्य हे आपल्या चेहऱ्यावर दिसून येते त्यामुळे आपल्या सौंदर्य अधिक खुलते.चेहरा आनंदी ठेवणे हेच माझ्या सौंदर्याचे खरे गमक आहे. असे उदगार प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांनी काढले.जे. एस. पी. एम संचलित ब्लॉसम पब्लिक स्कूल, ताथवडे, येथील तीन दिवशीय वार्षिक स्नेहसंमेलन शाळेत अत्यंत उत्साहाने संपन्न झाले.या स्नेह संमेलनाच्या सांगता प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे उदघाटन प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. दुसऱ्या दिवशी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष विजय पाटकर,जेएसपीएम ताथवडे संकुलाचे संचालक डॉ पी.पी विटकर, तर सांगता समारंभ प्रार्थना बेहेरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला . यावेळी कॅंपसचे सहसंचालक डॉ सुधीर भिलारे,प्रशासन प्रमुख रवी सावंत,राजेश्वरी रविराज सावंत, जेएसपीएमचे कार्यक्रम संचालक ॲग्नेस मार्कस,मुख्याध्यापिका स्वाती आरू, उपमुख्याध्यापिका दीपा पवार यांच्यासह जियो सॉफ्टवेअर डेव्हलपर्स व माजी विद्यार्थी दिग्विजय निकम, रिचा नहार, श्रुतिका लोकापुरे आदी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम एकूण तीन दिवस मोठ्या चैतन्यपूर्ण वातावरणात पार पडला. महत्‍वपूर्ण संदेश व आकर्षक प्रस्तुती यासाठी प्रसिद्ध असलेल्या या महोत्सवाने अवघ्या रसिकांचे मन जिंकले. ‘अतुल्य भारत’ हि संकल्पना घेऊन पहिल्या दिवशी प्री-प्रायमरी विभागाने आपले चिमुकल्यांचे कलागुण अत्यंत देखण्या पद्धतीने सादर केले. उपस्थितांचे स्वागत विद्यार्थ्यांनी फार उत्साहाने केले. यावेळी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी सौ कुलकर्णी यांनी वाचनाचे महत्त्व सांगितले. त्यानंतर प्राचार्य स्वाती आरु यांनी शाळेच्या कार्य अहवालाचे वाचन केले. विद्यार्थ्यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या गायनाने सगळ्या प्रेक्षकांना माना डोलवायला भाग पडल्या. बालगोपालांचे बहारदार नृत्य, नाटक यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली. प्रथम प्रायमरी विभागाने ‘स्वर्णिम भारताच्या गौरवशाली इतिहासाने’ कार्यक्रमाची बहारदार सुरुवात केली. विविध राज्यातील लोकनृत्य, स्वातंत्र्यसैनिकांचा गौरवशाली इतिहास या कार्यक्रमाने सगळ्यांची मने जिंकली. दुसऱ्या दिवशी अभिनेता विजय पाटकर यांनी अभ्यासा बरोबर कला- क्रीडांच्या उपक्रमात सहभागी व्हावेत, असा सल्ला दिला.माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तर या कार्यक्रमात अधिक रंगत आणली. प्रत्येक कार्यक्रमातून एक महत्वपूर्ण संदेश हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्याचे प्रेक्षकांमधून घोड्यावरील आगमन हा सोहळा तर नेत्रदीपक ठरला. कार्यक्रमाचे विद्यार्थ्यांनी केलेले सूत्रसंचालन हे तर अवर्णनीय होते. अतुल्य भारतात सक्षम नागरिक घडविणे या भावनेने संपूर्ण सोहळा हा अविस्मरणीय व नेत्रदीपक असा ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे संस्थापक सचिव तथा आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले . हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्या श्रीमती स्वाती आरु, शैक्षणिक संकुलाचे संचालक डॉ. पी पी विटकर , संस्थेचे परिसर संचालक रवी सावंत, सुधीर भिलारे यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. सर्व विभागाचे पर्यवेक्षक, पर्यवेक्षिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेच्या उपप्राचार्या दीपा पवार यांनी केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page