अँबी व्हॅली व लायन्स क्लब ऑफ लोणावळा,खंडाळाच्या वतीने घेतलेल्या रक्तदान शिबिरात १३० रक्त बाटल्यांचे संकलन

मावळ मराठा न्यूज -अँबी व्हॅली आणि लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा च्या संयुक्त विद्यमाने मेगा ब्लड डोनेशन कॅम्पचेआयोजन अँबी व्हॅली बेस हॉस्पिटल आंबवणे येथे पार पडले त्यात १३० रक्त बाटलीचे संकलन करण्यात आले .प्रत्येक रक्तदात्यास पाच लाख रुपयांचा अपघाती विमा व ड्रेसचे वाटप करण्यात आले .यावेळी मुख्य अतिथी श्री सुमितकुमार वाईस प्रेसिडेंट ऑफ अँबी व्हॅली हॉस्पिटॅलिटी ,डॉ .राज चव्हाण ,शालिनी श्रीवास्तव ,प्रदीप सर तसेच आधार ब्लड बँकेची पूर्ण टीम आणि लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा चे अध्यक्ष ला, ऍड .प्रफ्फुल बी लुंकड ,सचिव विरल गाला ,खजिनदार प्रकाश जैन ,डॉ .पोपट ओसवाल देवेंद्र नालेकर,मनोज लुंकड ,निमेश पारेख ,मंगेश कदम ,नंदू खंडेलवाल ,योगेशभाई शाह ,डॉ.संगीता लुंकड ,कांता ओसवाल,दिपाली गाला ,निराली नालेकर ,प्रीतम लुंकड, सारिका पारेख ,कोमल जैन ,अश्विनी कदम चारू शाह ,धरमेशभाई शाह आदी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page