डोंगरगाव ग्रामपंचायतीला राजर्षी शाहू “आदर्श सरपंच” पुरस्कार २०२४ जाहीर


मावळ मराठा न्युज, लोणावळा :- मावळातील डोंगरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सुनिल बाळकृष्ण येवले यांना १५०० ग्रामपंचायती मधून उत्पन्न कमी असून उत्कृष्ट समतोल साधत विकास केल्याबद्दल त्यांचा कार्याची दखल घेत राजर्षी शाहू”आदर्श सरपंच”पुरस्कार २०२४ जाहीर करण्यात आला आहे. विविध विकास कामे, सामाजिक, आर्थिक,शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्य तसेच गावच्या विकासासह, तालुका, जिल्हा, राज्य व देशाच्या विकासात दिलेल्या योगदानाची दखल घेऊन केलेल्या कार्याचा गौरव म्हणून राजर्षी शाहू “आदर्श सरपंच” पुरस्कार २०२४,राजर्षी शाहू प्रतिष्ठाण,दक्ष मराठी पत्रकार संघ व जागृत शोध वृत्तपत्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १६ फेब्रुवारी २०२४ रोजी पुणे येथे गौरवण्यात येणार आहे. पुण्यातील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, गंजपेठ, पुणे ०२ येथे सदर पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. भगवान रामचंद्र श्रीमंदिलकर राजर्षी शाहू प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष अध्यक्ष आहेत. मावळ मराठा न्युज परिवारच्या वतीने डोंगरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सुनिल बाळकृष्ण येवले यांना पुढील वाटचालीसाठी खूपखूप शुभेच्छा.




