बोधिसत्वा सारखं जीवन जगणारे कृष्णराव भेगडे -तळेगाव जनरल हॉस्पिटल तर्फे श्रद्धांजली

मावळ मराठा न्युज – तळेगाव, बोधिसत्वा सारखं जीवन जगणारे- मावळ भूषण माजी आमदार कृष्णराव भेगडे साहेबांना तळेगाव जनरल- हॉस्पिटल तर्फे आज भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली! संस्थेचे अध्यक्ष श्री गणेशजी खांडगे चेअरमन शैलेशभाई शहा- नर्सिंग स्कूल चे पालकमंत्री डॉक्टर शाळीग्राम भंडारी संस्थेचे संचालक श्री सुकेंदू कुलकर्णी आणि डॉक्टर किरण देशमुख स्कूलच्या प्राचार्य मोनालिसा मॅडम-सर्व शिक्षक वृंद आणि नर्सिंग स्कूलच्या सर्व विद्यार्थिनी या अत्यंत रुदय प्रसंगी उपस्थित होते! चेअरमन शैलेश भाई शहा यांनी आपल्या मनोगतात आदरणीय कृष्णरावांचा मायमर मेडिकल कॉलेज आणि नर्सिंग स्कूलच्या उभारणीत आणि त्याबरोबर इतर शैक्षणिक विभागातील निर्मितीत सिंहाचा वाटा होता म्हणूनच त्यांना शिक्षण महर्षी संबोधित केले जाते! डॉक्टर शाळीग्राम भंडारी यांनी- जीवा सवे जन्मे मृत्यू- जोड जन्म जात ! जे जे दिसे ते ते- विश्व नाशवंत- असं असलं तरी आपल्या हाती आलेलं आयुष्य- आपण कसं जगावं असं ज्यांच्याकडून शिकावं अशा आदरणीय कृष्णरावजी भेगडे साहेबांच्या विषयी सर्वांच्या हृदयात असलेली कृतज्ञता- आपल्या मनोगतात व्यक्त केली! महा निर्वाण प्रसंगी- भारतीय संस्कृतीने स्वीकारलेल्या मंत्रोच्चाराने- सामूहिक श्रद्धांजली वाहून- या सांत्वन सभेची सांगता झाली!

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page