मावळ लोकसभा शिवशाही व्यापारी संघ महिला आघाडी तळेगाव दाभाडे अध्यक्षपदी स्वत्नाली प्रकाश साठे


मावळ मराठा न्युज :- मावळ – प्रतिनिधी, शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा संचिताताई गोसावी व मुख्य सचिव कल्पना मोरे यांच्या नेतृत्वाखाली स्वत्नाली प्रकाश साठे यांची मावळ लोकसभा अंतर्गत तळेगाव दाभाडे शिवशाही व्यापारी संघ महीला आघाडीच्या अध्यक्षापदी संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी जाहीर केली.नवनियुक्त तळेगाव दाभाडे महीला अध्यक्षा स्वत्नाली साठे यांनी महिला भगिनींच्या न्याय व हक्कासाठी शासन दरबारी प्रश्न मांडून ते सोडविण्यासाठी सदैव कटिबध्द राहण्याच्या सुचना दाखले यांनी देऊन पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.




