विद्यार्थ्यांनी निरोप समारंभ,यशवंत व्हा! कीर्तीवंत व्हा! स्वतःचा ठसा उमटवा! सौ. वत्सलाताई वाळंज



मावळ मराठा न्युज:- आंबावणे, सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालय आंबवणे या विद्यालयात इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांनी निरोप समारंभ आयोजित केला. या प्रसंगी आंबवणे गावाच्या मा.आदर्श सरपंच व कोराईगड शिक्षण संस्था संचालिका सौ. वत्सलाताई नंदकुमार वाळंज, पालक शिक्षक संघांचे अध्यक्ष योगेशभाऊ वाळंज विद्यालयाचे मुख्याध्यापक भटू देवरे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. सरस्वती पुजनाने कार्यक्रमाची सुरवात केली. मान्यवर व सर्व शिक्षक यांचा सन्मान करण्यात आला.सौ. वत्सलाताई वाळंज आपल्या मनोगतात म्हणाल्या की,विद्यार्थीनी नी आपला वेगळा ठसा उमटवला पाहिजे. यशवंत व्हा!कीर्तीवंत व्हा! तुम्हाला पुढील शिक्षणासाठी काही मदत लागल्यास आवश्यक सांगा.तसेच सर्व परीक्षार्थिना शुभेच्छा देऊन मौलिक मार्गदर्शन केले.शाळेतील उपक्रम व इतर कामकाजा मुळे विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.जड अंतःकरणाने हा समारंभ आठवणींनी उजळून निघाला.योगेशभाऊ वाळंज, भटू देवरे, संजय कुलथे, बाळासाहेब खेडकर या शिक्षकांनी मनोगतातून मार्गदर्शन केले. इयत्ता 10वी च्या विद्यार्थ्यांनी पृथ्वीगोल प्रतिमा विद्यालयास भेट दिली. स्नेह भोजनाने कार्यकमाची सांगता केली.वर्गशिक्षक रविंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांनी आयोजित केला. राहुल आवळे,विजय दळवी, शालिनी देवरे, संतोष दळवी , महादेव खेडकर, मंदा दळवी, अरुणा दळवी यांनी मेहनत घेतली. स्नेह भोजनाने कार्यकमाची सांगता केली.




