मावळातील रस्त्यांची दयनीय अवस्था ; याला कारणीभूत फक्त भ्रष्ट व्यवस्था..

मावळ मराठा न्युज – लोणावळा,मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील शेळके त्या अगोदर संजय बाळा भेगडे असे दोन्ही मिळून जवळपास साडेसात हजार कोटीहुन अधिक निधी आणला असावा.परंतु विकास विकास म्हणताना त्याचे खरे रूप आणि किती विकास झाला हे सर्व जेव्हा मावळात पाऊस पडतो तेव्हाच कळतं काय आणि किती विकासाच्या नावावर भ्रष्ट्राचार झाला आहे ते.मावळात एकशे सतरा ग्रामपंचायती आहेत अशी एकही ग्रामपंचायत नाही त्या गावातला रस्ता हा खड्डे मुक्त आहे.त्यामुळे नागरिकांना प्रश्न पडतो नेमका हा हजारो कोटींचा निधी जातो तरी कुठे? याचे उत्तर सरळ आणि एकदम सोपे आहे ते म्हणजे ठेकेदाराला मिळणारा त्याचा कामाचा मोबदला.कोणतेही काम हे कमिशन शिवाय होतंच नाही. ग्रामपंचायत च्या रस्त्याचे काम द्यायचं म्हटलं तर लोकप्रतिनिधी,इंजिनिअर मग निधी मंजूर करणारे,प्रत्यक्षात पेंमेन्ट देणारे अशी मोठी साखळी असते ठेकेदाराला त्याचा कामाचे पेमेंट हे त्याचा कामाचे पूर्ण १०० टक्के मिळत नाही ते मिळते ७० टक्के त्यात मटेरियल आणि लेबर असा त्याला मेळ घालावा लागतो. त्यातही ज्याला हे काम खरोखर प्रामाणिक पणे करायचे आहे तो ठेकेदार हे काम त्या ७० टक्के रक्कमेत घेणारच नाही कारण त्याला त्या रक्कमेत परवडणारच नाही.त्यामुळे आपल्या आपल्या कार्यकर्त्याला ठेका दिला जातो.त्यामुळे त्या ठेकेदाराची कुवत असो वा नसो काम हे दर्जाहीनच होणार. कोणी कितीही सांगितलं मला गुणवत्तापूर्ण काम पाहिजे ते फक्त जनतेत बोलण्यापूरते असते हे वारंवार सिद्ध झालं आहे. कार्यकर्त्याला ताकद देणे हे जऱी खरं असलं तरी त्याची कुवत,क्षमता,अनुभव यावर मर्यादा येतातच.तो ठेकदार उत्कृष्ट दर्जाचे काम करूच शकत नाही तरी त्याला काम दिलं जातं इकडेच खरी भ्रष्ट्राचाराची गोम आहे.किती खावं किती नाही याला जोपर्यंत शिस्त लागत नाही तो पर्यंत जनतेच्या पैशांची अशीच उधळण होत राहणार. आता मावळच्या रस्त्यांची अवस्था एवढी बिकट आहे.हजारो कोटी निधी खर्च करून आता अशी म्हणायचीवेळ आली आहे की “खड्डे मुक्त रस्ता दाखवा आणि मोठं बक्षीस मिळवा”.

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न मावळ तालुका पत्रकार संघ नवनिर्वाचित कार्यकारिणी करणार मावळच्या रस्त्यांचा पंचनामा

मावळतील काही पत्रकार अलिबाग,नागपूर गोवा येथे कोणाच्या सौजन्याने अभ्यास दौरे करतात त्यापेक्षा आपल्या मावळ तालुक्याचा रस्त्यांचा अभ्यास दौरा करावा त्यात सत्य परिस्थिती काय ते जनतेला सांगता येईल. याबाबत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न मावळ तालुका पत्रकार संघाची नवनिर्वाचित कार्यकारिणी लवकरच असा मावळ रस्ता अभ्यास दौरा करणार आहे. यात मावळ तालुका अध्यक्ष सचिन जी ठाकर, कार्याध्यक्षा रेखा भेगडे,गणेशजी वायकर, विजय जी सुराणा आदी सर्व पत्रकार याबाबत नियोजन करणार आहेत.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page