स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेत वेदांत कुलकर्णी या तळेगाव दाभाडे च्या सुपुत्रचे सुयश

मावळ मराठा न्युज:- पुणे , दि. २४ डिसेंबर – नावीन्यपूर्ण अभियांत्रिकी क्षेत्रातील स्मार्ट इंडिया हॅकथॉन स्पर्धा म्हैसूर येथे आयोजित करण्यात आली.या स्पर्धेत विश्वकर्मा इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे येथील अभियांत्रिकीचे विध्यार्थी यांची टीम द रोबोटिक्स फोरमचे सार्थक वेदांत कुलकर्णी,निशांत होनमुटे, टीम लिडर, मधुरा सालापूरकर, प्रतीक गरवारे, आदित्य साळुंके आणि प्रशांत बगळे यांनी जी कोडिंग प्रोग्रामिंगआणि रोबोटिक्स या विषयीचे नाविन्यपूर्ण सादरीकरण केले.या सर्वोत्कृष्ट प्रोग्रामिंगला राष्ट्रीय स्तरावरील प्रथम क्रमांक प्रदान करण्यात आला.पारितोषिकची ट्रॉफी, सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.स्मार्ट इंडिया हॅकेशॉन स्पर्धेत व्हीआयटीच्या रोबोटिक्स फोरमचे यश तळेगावदाभाडे येथील वेदांत कुलकर्णी चा सहभाग.भारत सरकारद्वारा आयोजित स्मार्ट इंडिया हॅकेशॉन ही अभियांत्रिकी स्पर्धा कर्नाटक राज्यातील मैसूर येथे पार पडली. या स्पर्धेत विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे येथील अभियांत्रिकीच्या रोबोटिक्स फोरमने सर्वोत्कृष्ट कामगिरी करताना सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्रक आणि एक लाख रुपयांचा धनादेश पटकावला. दी ररोबोटिक्स फोरमचे हे यश, संशोधन ब्रेक लाईटसाठी मोल्ड तयार करण्यासाठी सर्वोत्कृष्ट ठरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतिम पाच संघाला ऑनलाईन संबोधित करुन प्रोत्साहित केले होते. पुढील संशोधनात्मक कार्यासाठी प्रेरणा वाढविणारे हे यश आहे असे मत वेदांत कुलकर्णी याने मावळ मराठा न्युज शी बोलताना व्यक्त केले.सदस्य दी रोबोटिक्स फोरम व्हीआयटी, पुणे.वेदांत कुलकर्णी सह आदित्य साळुंखे, सार्थक होनमुटे, मधुरा साळापुरकर, प्रथमेश बगले, प्रतीक गरवारे यांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धे साठी मिळालेल्या सीएनसी मशीनसाठी त्यांनी जी कोडद्वारे सीएनसी पार्ट्स तयार केले. त्यांच्या या कोडींग, सर्वोत्कृष्ट सादरीकरणाला भारत सरकारच्यावतीने प्रथम क्रमांक देऊन गौरविले. सर्वोत्तम मॉडेल्स् बंगळुरुमधील ऑटो डेस्क कंपनीकडे प्रदर्शनासाठी संग्रहित केले आहे. यंदाच्या वर्षी प्रथम ऑनलाईन सादरीकरण प्रात्यक्षिकांच्या सादरीकरणातून पाचशे संघ सहभागी झाले होते. त्यातून अंतिम स्पर्धेसाठी पाच संघांची निवड झाली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page