*महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त महाविद्यालयाच्या ‘ज्ञान स्त्रोत’ ग्रंथालयात भव्य पुस्तक प्रदर्शन संपन्न!*







मावळ मराठा न्यूज – लोणावळा,दिनांक ३ ऑक्टोबर 2026 :-दि. २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या ‘ज्ञान स्त्रोत’ (ग्रंथालय) विभागामध्ये विशेष कार्यक्रमाचे व ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देशप्रेमाचा व वाचनाचा संदेश दिला.महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनचरित्रावर व विचारसरणीवर आधारित विविध ग्रंथांचे प्रदर्शन या वेळी भरवण्यात आले. विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन विविध ग्रंथांचा सखोल परिचय करून घेतला आणि त्यांच्या जीवनकार्यातून प्रेरणा घेतली. हा कार्यक्रम प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख सर, ग्रंथालय प्रमुख प्रा. योगेश कवडे सर आणि ग्रंथालय समिती यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रेरणादायी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. याप्रसंगी वरिष्ठ परीक्षा विभाग प्रमुख प्रा. श्री. राजेंद्र देवरे सर, प्रा. डॉ. पवन शिनगारे, प्रा. श्री. धनराज पाटील, प्रा. पराग कुलकर्णी, प्रा. रोहित राणे, प्रा. रूपाली गवळी मॅडम, प्रा.भारती राजेभोसले मॅडम व प्रा. भावना मॅडम उपस्थित होते. तसेच, ग्रंथालयाचे कर्मचारी डॉ. श्रीकांत होगले, चांगुना ठाकर मॅडम, जांभुळकर मॅडम आणि इतर कर्मचाऱ्यांनी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती बद्दल प्रचंड उत्साह दिसून आला.



