*व्यसनमुक्त तरुण हेच उद्याचे भवितव्य! – ॲड. संकेत राव**व्यसनमुक्त भारत जागरुकता अभियान सप्ताहाचे उद्घाटन*

मावळ मराठा न्युज – पिंपरी,(प्रदीप गांधलीकर) दिनांक : ०३ ऑक्टोबर २०२६ ‘आजचा व्यसनमुक्त तरुण हेच उद्याचे देशाचे भवितव्य आहे!’ असे विचार न्यायविद फाउंडेशनचे विश्वस्त ॲड. संकेत राव यांनी चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे शुक्रवार, दिनांक ०२ ऑक्टोबर २०२६ रोजी व्यक्त केले. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय आणि अधिकारता मंत्रालय, महाराष्ट्र राज्य पुणे, होप मानसिक पुनर्वसन व व्यसनमुक्ती केंद्र भोसरी तसेच न्यायविद लीगल अँड सोशल जस्टिस फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्यसनमुक्त भारत जागरुकता अभियान सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ॲड. संकेत राव बोलत होते. ज्येष्ठ विधिज्ञ आणि न्यायविद लीगल अँड सोशल जस्टिस फाउंडेशन, पुणेचे अध्यक्ष ॲड. सतिश गोरडे यांच्या हस्ते सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी होप व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष डॉ. विजय मोरे, केंद्र समन्वयिका प्रा. सुनीता मोरे, उपाध्यक्ष ॲड. सचिन शिंदे, ॲड. महेश सोनवणे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.ॲड. संकेत राव पुढे म्हणाले की, ‘शासकीय सर्वेक्षणानुसार प्रत्येक तिसऱ्या घरातील व्यक्ती व्यसनाधीन आहे. अंमली पदार्थांच्या व्यापारातून संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू आहेत. भारताची भौगोलिक परिस्थिती ही अंमली पदार्थांच्या व्यापारासाठी अनुकूल आहे. त्यामुळे या पैशातून देशात अराजक माजवून सत्तांतर घडविण्याचे षडयंत्र परकीय शक्ती सातत्याने करण्याचे प्रयत्न करीत आहेत. वास्तविक भगवद्गीतेत मनावर विजय मिळवला तर शरीरातील संपूर्ण इंद्रियांवर आपण विजय मिळवू शकतो, अशी शिकवण दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर व्यसनाधीन तरुणाईचे मनपरिवर्तन घडवून व्यसनमुक्त तरुण निर्माण करण्याचे कार्य होप व्यसनमुक्ती केंद्र सत्तावीस वर्षांपासून करीत आहे. आज महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त २०२७ सालापर्यंत आपण सर्व नागरिकांच्या सहभागातून देशातल्या तरुणाईला व्यसनमुक्त करण्याचा संकल्प करू या!’ डाॅ. विजय मोरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी व्यसनमुक्ती बाबत शपथ देण्यात आली. चंद्रकांत फुगे, योगेश कुडपणे, विकास गायकवाड, संदेश तावरे, सुभाष जाधव, रामानू सोमाणी यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रा. सुनीता मोरे यांनी आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page