सूर्यनमस्कारातून आरोग्याचा जागर; शिक्षिका महिला ट्रेकिंग ग्रुप हिरकणींचा १०८ सूर्य नमस्कारांचा उपक्रम

मावळ मराठा न्युज -तळेगाव दाभाडे, प्रतिनिधीधावपळीच्या जीवनशैलीत महिलांनी आपल्या आरोग्याला प्राधान्य द्यावे, तसेच शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक प्रसन्नता आणि सकारात्मक जीवनशैली जोपासावी, या उद्देशाने तळेगाव दाभाडे येथील शिक्षिका महिला ट्रेकिंग ग्रुप ‘हिरकणी’च्या वतीने रविवारी (दि. ४) १०८ सूर्यनमस्कार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.सकाळी सहा वाजता झालेल्या या उपक्रमात ३० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत एकाच वेळी १०८ सूर्यनमस्कार पूर्ण केले. सूर्यनमस्कारानंतर सहभागी महिलांनी ध्यानधारणा केली. त्यामुळे मनःशांती, एकाग्रता आणि सकारात्मक ऊर्जेचा अनुभव मिळाल्याचे महिलांनी सांगितले.महिलांमध्ये नियमित व्यायाम, योग, ध्यान आणि सूर्यनमस्काराची आवड निर्माण करणे, तसेच दैनंदिन जीवनात आरोग्याला महत्त्व देण्याचा संदेश देणे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. ‘पाऊल वाटेवर, नजर शिखरावर’ या हिरकणी ग्रुपच्या घोषवाक्याला साजेशी जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास महिलांनी या उपक्रमातून दाखवून दिला.महिलांनी आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून नियमित योग, ध्यान, व्यायाम आणि सूर्यनमस्काराचा सराव करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.या उपक्रमाचे आयोजन हिरकणी महिला शिक्षिका ट्रेकिंग ग्रुपच्या संस्थापिका सौ. स्मिता संदीप कांबळे आणि कार्यवाहिका सौ. निता निंबाळकर यांनी केले

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page