गणेशोत्सव मंडळाची आढावा बैठक सत्यसाई कार्तिक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

मावळ मराठा न्यूज़ ,लोनावला :- लोणावळा शहर व ग्रामीण यांची परिसरातील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी यांची नुकतीच हॉटेल चंद्रलोक येथे लोणावला उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधिकारी आय पी एस सत्यसाई कार्तिक यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली यावेळी शहर पोलिस निरीक्षक सीताराम दुबल,ग्रामीण चे पोलिस निरीक्षक किशोर धुमाल,लोनावला नगरपरिषद मुख्याधिकारी पंडित पाटिल ,विजवितरण चे शिवाजी चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते .यावेळी नगरपरिषदेच्या वतीने रस्ते दुरुस्ती ,बाप्पा विसर्जन हौद,नदी स्वछता करण्याचे आश्वासन पाटिल यांनी दिल विजवितरण चे चव्हाण यांनी मंडळाना विज मीटर,अडथळा ठरणाऱ्या मिरवणूक रस्त्यावरील वायरी लवकरच दूर करण्यात येईल आणि अखंडित विज पुरवठा करण्याची ग्वाही दिली तर दुबल आणि धुमाल दोन्ही पोलिस निरीक्षका नी पोलिस यांचे कडून देखील पूर्ण सहकार्य करण्यात येईल याची शास्वती दिली आपल्या अध्यक्षीय भाषणात सत्यसाई कार्तिक यांनी शांततेत आणि आनंदात गणेशोत्स्व साजरा करण्याचे आवाहन केले.आणि मुस्लिम बांधव यांनी आपला ईद चा जुलुस १ ऑक्टोबर रोजी काढणार असल्याचे जाहिर केल्याने त्यांचे आभार मानले .यावेळी गणराया अवार्ड चे वितरण देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page