लोणावळा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबिर आजिवली गावात संपन्न


मावळ मराठा न्यूज,लोणावळा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबिर मावळातील अजिवली या गावात १७ डिसेंबर ते २३ डिसेंबर २०२२ या काळात संपन्न झाले.आजीवली या गावात या शिबिराचे उद्घाटन तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षा बबाबाई लायगुडे यांच्या हस्ते करण्यात आले.तर लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट च्या सदस्या मा.ॲड.नीलिमा खिरे व पत्रकार श्री.विशाल पाडळेयांच्या हस्ते समारोप करण्यात आला. शिबिरामध्ये स्वयंसेवकांनी गावात स्वच्छता, देवस्थानातील रस्ता ,गावकऱ्यांसाठी गावातील ओढ्याला बंधारा बांधणे, जल संवर्धन, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती ,रक्तदान श्रेष्ठ दान जनजागृती व आरोग्य विषयी कामकाज स्वयंसेवकांनी केले.स्वयंसेवक व ग्रामस्थांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये डॉ. प्रवीण देसाई यांचे उद्योजकता विकास ,श्री. सर्जेराव पाखरे यांचे मी कसा घडलो, प्रा. संजय साळुंखे यांचे व्यक्तिमत्व विकास, ॲड. विनय दाभाडे यांचे शिवचरित्र,डॉ.चंद्रशेखर भगत यांचे आजचा युवक व वैचारिक दिशा, डॉ. सीमा शिंदे यांचे मानवी अवयवदान काळाची गरजमा. श्री. बी.बी. पाटील यांचे मी व माझी ओळख (विद्यार्थी) या विषयांवर व्याख्यान झाले. तसेच साधू वासवाणी मिशन यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ३१ बॅग रक्त डोनेट करण्यात आले.गावामध्ये स्वयंसेवकांनी केलेल्या कामाचे कौतुक ग्रामस्थांनी केले. समारोप प्रसंगी मान्यवरांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य मा.डॉ.दिगंबर दरेकर, उपसरपंच दिपाली लायगुडे ,श्री अनंता महाराज लायगुडे, श्री.बबन लायगुडे ,श्री.अंकुश लायगुडे ,श्री.विठ्ठल शिंदे,श्री .रमेश मोरे ,कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा.राहुल सलवदे ,प्रा.संजय साळुंखे, प्रा. रोहन वर्तक,प्रा.अमोल नवगिरे,प्रा.भूषण गोदके ,इतर ग्रामस्थ व NSS स्वयंसेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पवन शिनगारे यांनी केले तर आभार कनिष्ठ विभाग राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. धनराज पाटील यांनी व्यक्त केले.




