मावळ लोकसभेचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि संजोग वाघेरे यांनी केले आपल्या कुटुंबियांसोबत मतदान

 मावळ मराठा न्युज :-पिंपरी,मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे या दोघांनी पिंपरी चिंचवड शहरातील मतदानकेंद्रात मतदान केले.बारणे यांनी थेरगावच्या संचेती प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, दक्षिण उत्तर इमारत, तळमजला, दक्षिणेकडून खोली नंबर तीन (बूथ नं २१८ ) या मतदान केंद्रात मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी सरिता, पुत्र प्रताप व विश्वजीत, सून स्नेहा हे कुटुंबीय होते.संजोग वाघेरे यांनी पिंपरी वाघेरे, रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले महाविद्यालय तळ मतदान केंद्र ३१० , खोली क्र. ३ या मतदान केंद्रावर मतदान केले. त्यावेळी त्यांच्यासोबत पत्नी उषा वाघेरे, पुत्र ऋषिकेश हे होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page