लोणावळा शहरासह मावळ व मुळशी तालुक्यातील पर्यटन स्थळांवरील बंदी अखेर आज पासून मागे



मावळ मराठा न्युज :- भुशी डॅम वर झालेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्या पार्श्वभूमीवर भुशी येथील छोट्या टपरीधारकांवर प्रशासनाकडून बुलडोझर फिरवण्यात आला होता तेव्हापासून लोणावळा शहरांत सर्वच पक्ष आणि जागृत नागरिक यांच्या वतीने त्यांचा पोटापाण्याच्या प्रश्नासाठी आंदोलने करण्यात आली. शेवटी आज ३० जुलै दुपारी बारा वाजल्यापासून लोणावळा,मावळ व मुळशी तालुक्यातील पर्यटन स्थळांवरील बंदी मागे घेण्यात आली आहे.त्यानंतरच लोकप्रतिनिधी यांना जाग आली आणि भुशीचा प्रश्न जागत राहिला परंतु त्यांचा खरी कमाईचा बराचसा वेळ निघून गेला आहे.त्यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी याबाबत जिल्हाधिकारी व मावळचे प्रांत अधिकारी यांच्याशी संपर्क साधत लोणावळा व मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळांवर बंदी घातल्याने तेथील स्थानिक हातावरील पोट असणाऱ्या व्यवसायिकांच्या पोटापाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने तात्काळ सदरचे बंदी आदेश मागे घ्यावेत अशी मागणी केली होती. त्याचप्रमाणे लोणावळा खंडाळा टॅक्सी असोसिएशनच्या वतीने निखिल कवीश्वर यांच्या नेतृत्वाखाली काल सोमवारी २९ जुलै रोजी श्रीराम मंदिर गवळीवाडा ते भुशी धरण अशी पदयात्रा काढत त्या ठिकाणी प्रांत अधिकारी यांचे प्रतिनिधी लोणावळा मंडल अधिकारी यांना सदरची बंदी उठवण्याबाबत निवेदन देण्यात आले त्या आंदोलनाला छोट्या व्यावसायिक आणि रिक्षा टॅक्सी मालक चालक यांचे कडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. लोणावळा खंडाळा टॅक्सी चालक-मालक संघटना यांनी देखील पोलीस प्रशासन व नगरपरिषद प्रशासन यांना २९ जुलै रोजी निवेदन दिले होते. लोणावळा जागरूक नागरिक च्या वतीने किरण गायकवाड यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मेल पाठवत सदरची बंदी उठवण्याबाबतची विनंती केली होती. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे हे देखील जिल्हाधिकारी यांच्याशी याबाबत बोलले होते. भाजपाने देखील आंदोलनाचा इशारा दिला होता. या सर्व मान्यवरांचा व संघटनांचा वाढता दबाव यामुळे अखेर पर्यटन स्थळांवर लागू केलेली बंदी ही मागे घेण्यात आली. लोणावळा परिसरातील नागरिकांसाठी पर्यटन हाच एकमेव व्यवसाय आहे. भुशी धरण, लाईन्स पॉईंट, सहारा पुल,राजमाची पॉईंट ग्रामीण परिसरातील नागरिकांना पर्यटनावरच आपला उदरनिर्वाह करावा लागतो. पुन्हा बंदी लागू करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला होता.




