मावळ लीगल प्रॅक्टीशनर्स असोसिएशन वतीने राहुरीतील वकील दाम्पत्य अपहरण आणि हत्या घटनेचा निषध

मावळ मराठा न्युज,वडगांव -ॲड.राजाराम आढाव,मनीषा आढाव रा. राहुरी, जि अहमदनगर या वकील दाम्पत्याचे अपहरण करून खंडणी साठी करुन दिनांक २५/१/२४ रोजी निर्घृण हत्या करणेत आली . सदर दांपत्य हे ऑफिसर ऑफ कोर्ट होतें. ही घटना गंभीर स्वरूपाची असून सदर घटनेचा वडगांव मावळ लीगल प्रॅक्टीशनर्स असोसिएशन वतीने सदर घटनेचा जाहीर निषेध करणेत आला. अशा घटना वकील वर्गाबाबत वारंवार घडत आहे. आरोपीस कायद्याने कडक शासन व्हावे व ऍडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट बील त्वरित मंजूर करुन त्यांची अंमलबजावणी त्वरित करावी अश्या आशयाचे निवेदन वडगांव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन वतीने निवासी नायब तहसीलदार सो मावळ यांना देणेत आले. त्यावेळी अध्यक्ष ॲड सोमनाथ पवळे, ॲड धनंजय कोद्रे, ॲड दीपक चौधरी, उपाध्यक्ष ॲड प्रिया पंडित, ॲड मोनाली कुलकर्णी शेलार ,खजिनदार ॲड मीनाक्षी ढोरे, सचिव ॲड प्रनोती पिंगळे, ॲड अक्षय रौंधल, सदस्य ॲड हेमंत साबळे, ॲड राम शहाणे, ॲड रोहित कदम , ॲड सुबोध कालेकर, ॲड प्रियांका शिंदे ढेरंगे, ॲड स्नेहा परदेशी, ॲड युक्ता पवार, ॲड सागर शेटे, ॲड करणं लोंढे, ॲड अंकित आलम आदी उपस्थित होते .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page