लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रिमोजचा जेष्ठ नागरिक संघ यांचा अभिनव उपक्रम

मावळ मराठा न्युज – लोणावळा,दिनांक १ ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिना निमित्ताने हुडको कॉलनी येथे ज्येष्ठ नागरिक संघ व लायन्स क्लब ऑफ सुप्रिमोज यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता राबविण्यात आले. ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यकारिणी च्या सदस्यांना यां प्रसंगी प्रमाण पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. लायन्स क्लब ऑफ सुप्रिमोजच्या अध्यक्षा सुरैया वाडीवाला,सेक्रेटरी रंजना पुटोल आणि कोषाध्यक्ष वर्तक,लोणावळा नगरपालिकाचे मोरमारे, संजय जेधे,अमीन वाडीवाला आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. दिनांक ३ ऑक्टोबर रोजी राजेश आगरवाल डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, उमेश आगरवाल,गिरीश पारख, जैन प्रकोष्ठ महामंत्री,लायंस क्लब ऑफ सुप्रिमोजचे सर्व मान्यवर पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य यांच्या उपस्थितीत संघांच्या व साने गुरुजींच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मान्यवरांचे सत्कार करण्यात आले,लायन राजेश आगरवाल, DG, पुणे, यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी धर्म पुत्र अभियान बद्दल माहिती दिली, जे ज्येष्ठ नागरिक एकटे राहत आहेत त्यांना धर्मपुत्र मदत करतील,त्यासाठी टीम तयार करण्यात आली आहे. लायन विश्वनाथ पुटोल यांनी जबाबदारी घेतली आहे. ज्येष्ठ नागरिकांना मानसिक आधार देणे, आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे,फोन वर गप्पा मारणे, तसेच नया सवेरा हा नविन प्रोजेक्ट नेत्र दानाचे महत्व व जन जागृती करण्यासाठी केला आहे, नेत्रदान करताना फक्त बुबुळ काढले जाते,१० % लोकांनी असे दान करून अंधत्व निर्मूलन करण्यात मदत करावी. यासाठी नया सवेरा एप्प वर एक call केला की एका तासात गाडी येऊन कॉर्निया कलेक्ट करतील, अनेक आजारांसाठी उपचार मोफत मिळतील असे सांगितले.लायन उमेश आगरवाल, लायन शिव आगरवाल, लायन सीताराम कदम, नामदेव घिसरे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यां कार्यक्रमाचे सूत्र संचालन जेष्ठ नागरिक संघाच्या सचिव रश्मी शिरसकर यांनी केले. पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली. अध्यक्ष तिखें यांनी आभार व्यक्त केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page