जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने विरंगुळा केंद्रात नऊ दुर्गा पूजन

मावळ मराठा न्युज लोणावळा,दिनांक १४ रोजी बुधवार यादिवशी जेष्ठ नागरिक संघाचा नवदुर्गा देवीचा कार्यक्रम विरंगुळा केंद्रात मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. नऊ देवींना हळदी कुंकू लावून त्यांची ओटी भरण्यात आली. जेष्ठ नागरिक संघाच्या सभासदांना नवदुर्गांचा मान देण्यात आला .नवदुर्गांनी नऊ दिवसांच्या नऊ रंगाच्या साड्या घातल्या आणि त्यांच्या हातात देवींच्या नावाचे बॅनर देण्यात आले होते.या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे आणि वक्त्या म्हणून ऍड बापूसाहेब भोंडे हाईस्कूल च्या संचालिका सौ.राधिका माधवराव भोंडे यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुण्यांबरोबर सौ. वीर देखील कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.कार्यक्रमाची सुरवात सानेगुरुजी यांच्या विश्व् प्रार्थनेने करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना जेष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा श्रीमती मृदुला पाटील यांनी केली. सुत्रसंचालन उपाध्यक्ष श्री रविन्द्र कुलकर्णी यांनी केले . कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.या कार्यक्रमात जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमा नंतर सर्वांना अल्पोपहार देण्यात आला. अल्पोपहारानंतर सर्व सभासद उत्साहाने गरबा खेळले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page