लोणावळा महाविद्यालयात ‘फन फेअर- युवा परिवर्तन ‘ चे आयोजन

मावळ मराठा न्यूज -लोणावळा,लोणावळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळण्यासाठी महाविद्यालयात ‘फन फेअर- युवा परिवर्तन ‘ चे आयोजन करण्यात आले असून सर्व आजी-माजी विद्यार्थी, सर्व सामाजिक संस्था व लोणावळा मधील सर्व नागरिकांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविणे व त्यांना प्रोत्साहन मिळणे साठी भेट द्यावी ही विनंती.फन फेअर मध्ये अत्यल्प दरात खाद्यपदार्थ, पेये,विविध गेम्स, कला मध्ये मेहेंदी व इतर कला असणार आहेत. आयकर कन्सल्टंट, बँक कन्सल्टंट अशा अनेक बाबतीत विद्यार्थ्यांचे २५ स्टॉल्स आहेत सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा. स्थळ, लोणावळा महाविद्यालय, जुना मुंबई पुणे रस्ता, वलवण, लोणावळा दिनांक १२ फेब्रुवारी २०२४वेळ: सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० या सोबत विद्यार्थ्यांची त्यांची सृजनशीलता वापरून बनविण्यात आलेले काही पोस्टर आणि त्यांच्या स्टॉल्स ची माहिती त्यात असणार आहे,असे जाहीर आवाहन लोणावळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख यांनी मावळ मराठा न्युज ला दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page