*रोटरीच्या पुढाकारातून साते येथे भव्य ३,१३१ वृक्ष लागवड अभियान*

मावळ मराठा न्युज -लोणावळा : रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३१ अंतर्गत रोटरी क्लब ऑफ लोणावळा व रोटरी क्लब ऑफ तळेगाव गोल्डन व इतर होस्ट आणि को-होस्ट क्लब्स यांच्या संयुक्त विद्यमाने साते गाव व सीआरपीएफ परिसरात भव्य ‘मेगा वृक्षारोपण अभियान’ उत्साहात पार पडले.या उपक्रमास डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटे. नितीन धामले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी व जवान, तसेच डिस्ट्रिक्ट ३१३१ मधील विविध रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जनजागृती व्हावी या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, साते येथे प्रतीकात्मक स्वरूपात १२ वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच साते गावालगतच्या डोंगर परिसरात ३,१३१ वृक्षांची लागवड सीआरपीएफच्या जवानांमार्फत करण्यात येत असून या सर्व वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारीही सीआरपीएफने स्वीकारली आहे.हरित पर्यावरण, मृदा व जलसंवर्धन तसेच जैवविविधतेच्या संरक्षणासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असून भविष्यात हजारो नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे. या अभियानात सहभागी झालेल्या सर्व रोटरी क्लब, सीआरपीएफ अधिकारी व जवान, स्वयंसेवक आणि नागरिकांचे रोटरी क्लब ऑफ लोणावळाच्या वतीने आभार मानण्यात आले.**”Create Lasting Impact”** या रोटरीच्या ब्रीदवाक्यानुसार पर्यावरण संवर्धनासाठी हा उपक्रम एक प्रेरणादायी पाऊल ठरला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page