वडगांव मावळ न्यायालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात


मावळ मराठा न्युज :- वडगांव,ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जयंतनिमित्त मराठी भाषा गौरव दिन उत्साहाने वडगांव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने वडगांव मावळ कोर्टात साजरा करणेत आला. यावेळी अनेक वकील बंधु भगिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. व मराठी भाषा जतन व संवर्धन करणे काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले. कोर्टाची भाषा देखील मराठी आहे व जास्तीत जास्त कोर्ट कामकाज मराठी भाषेत करावे व पक्षकारांना न्याय देनेचे असे अनेक मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी कवी कुसुमाग्रज यांचे मराठी भाषा संवर्धन करणेच विशेष कौतुक त्यांची कविता, पुस्तके यांचा यांचा उल्लेख करून करणेत आले. यावेळी अध्यक्ष अड सोमनाथ पवळे, ॲड धनंजय कोद्रे, ॲड मुना फ शेख, खजिनदार अड मीनाक्षी ढोरे म्हालस्कर ढोरे सचिव ॲड अक्षय रौंधल, अड हेमंत साबळे, अड धोकर, ॲड प्रियांका ढेरेंगे शिंदे आदी वकील बंधु भगिनीं उपस्थित होते. त्यावेळी सूत्रसंचलन ॲड प्रनोती पिंगळे व आभार ॲड राम शहाणे यांनी मानले.




